भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या निर्णायक सामन्यात यजमान भारताने न्यूझीलंडवर अक्षरशः वर्चस्व गाजवत तब्बल 168 धावांनी विजय मिळवला. या मालिकेचा मालिकावीर म्हणून भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या याची निवड झाली. मात्र, त्याचवेळी त्याने या अखेरच्या सामन्यात केलेल्या एका कामगिरीमुळे त्याच्या कारकिर्दीत एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सध्या भारतीय संघाचा सर्वोत्तम अष्टपैलू असलेला हार्दिक हा मागील काही मालिकांपासून भारतीय टी20 संघाचे नेतृत्व करत आहे. या मालिकेत देखील त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीची व नेतृत्वाची चुणूक दाखवली. अहमदाबाद येथील आपल्या घरच्या मैदानावर खेळताना त्याने प्रथम फलंदाजीत 17 चेंडूवर 30 धावांची खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीला आल्यावर त्याने पहिल्याच षटकात धोकादायक फिन ऍलनला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर धोकादायक ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्युसन व ब्लेअर टिकनर यांना बाद करत त्याने आपल्या 4 षटकात 4 गडी बाद केले.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारतीय संघासाठी एकाच सामन्यात 30 किंवा 30 पेक्षा अधिक धावा करणारा तसेच चार बळी मिळवणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. विशेष म्हणजे त्याने एकट्याने ही कामगिरी तीन वेळा केलीये. 2018 व 2022 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध हा कारनामा केलेला.
या सामन्याचा विचार केल्यास भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला. शुबमन गिलने नाबाद शतक करत भारतीय संघाला 234 पर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव केवळ 66 धावांवर गुंडाळत तब्बल 168 धावांनी विजय संपादन केला.
(Hardik Pandya Become Only Indian Who Score 30 runs and 4 Wickets In Same T20I Thrice)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वविजेत्या भारतीय संघाचे सचिन तेंडुलकरडून कौतुक, बीसीसीआयकडून मिळाला विशेष सन्मान
अर्थसंकल्पात क्रीडाक्षेत्राला मिळाले भरभरून! इतिहासात प्रथमच 3000 पेक्षा जास्त कोटींची तरतूद