भारतीय टी20 संघाचा प्रभारी कर्णधार हार्दिक पंड्या याने बुधवारी (16 नोव्हेंबर) न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 ट्रॉफीचे अनावरण केले. यावेळी त्याने टी20 विश्वचषक 2024च्या प्रवासाला सुरूवात झाली आहे. यावेळी त्याने या स्पर्धेसाठी कोणाला जागा मिळणार याबाबतही विधान केले आहे. भारताला 2022च्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत व्हावे लागले.
भारतीय पुरूष क्रिकेट संघातील काही खेळाडू सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये टी20 मालिका सुरू होण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) बोलत होता. तो म्हणाला, “आम्हा सर्वांना माहित आहे विश्वचषकात निराशा झाली, मात्र आम्ही सर्व प्रोफेशन प्लेयर आहोत आणि त्यातून कसे बाहेर पडत चांगली कामगिरी करायची हे टाऊक आहे. आम्ही आमच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत.”
आयसीसीचा पुढील टी20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळला गेला जाणार आहे. यामुळे पुढील दोन वर्षात भारताच्या टी20 संघात अनेक बदल पाहायला मिळतील. सद्यस्थिती पाहता येत्या दोन वर्षात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे संघाबाहेर जातील आणि पंड्या संघाचा कर्णधार असण्याची शक्यता आहे.
“पुढच्या टी20 विश्वचषकासाठी आमच्याकडे दोन वर्ष आहेत. ज्यामध्ये आम्ही चांगल्या आणि नव्या योजना आखू. त्यावेळी खूप क्रिकेट खेळले जाईल आणि तोपर्यंत खूप जणांना संधीही मिळतील. आता सर्व सांगणे आणि ठरवणे योग्य नाही. त्यासाठी भरपूर वेळ असून आम्ही सर्वजण बसून विचार करू आणि योग्य तो निर्णय घेऊ,” असेही हार्दिकने पुढे म्हटले आहे.
न्यूझीलंड दौऱ्यात भारत तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना 18 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे.
भारताचा टी20 संघ – शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत, संजू सॅमसन, इशान किशन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक. Hardik Pandya confirms lots of players will get enough opportunity ahead of 2024 T20 World Cup
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फाफ डू प्लेसिसचा डेविड वॉर्नरबाबत मोठा खुलासा; म्हणाला, ‘तो दादागिरी करणारा होता आणि गुंडगिरीसाठी..’
स्टीव्ह स्मिथचा निवृत्ती घेण्याचा विचार? म्हणाला, ‘क्रिकेट बाकी आहे, मात्र शेवटही..’