हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडला पोहोचला आहे. या दौऱ्यात भारताला तीन सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. यातील पहिला सामना 18 नोव्हेंबरला वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. याआधी भारताचा कर्णधार आणि यजमान संघाचा कर्णधार अर्थातच हार्दिक पंड्या-केन विल्यमसन यांनी वेलिंग्टनच्या रस्त्यावर क्रोकडाईल बाईक चालवण्याचा आनंद घेतला.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) यांचा बाईक चालवण्याचा व्हिडिओ न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांनी काळ्या रंगाचा गॉगल लावत आणि आपापल्या संघाची जर्सीमध्ये प्रवास करताना दिसले. या राईडआधी दोघांनी टी20 ट्रॉफीचे अनावरण केले.
टी20 मालिकेनंतर दोन्ही संघामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात दोन्ही संघांना आपापले उपांत्य फेरीचे सामने गमवावे लागले.
भारताच्या या दौऱ्याची सुरूवात टी20 मालिकेने होणार आहे. यातील पहिला सामना 18 नोव्हेंबरला वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियम येथे, दुसरा सामना 20 नोव्हेंबरला माउंट मौनगानुईच्या बे ओव्हलमध्ये आणि तिसरा सामना 22 नोव्हेंबरला नेपियरला मॅकलीन पार्क येथे खेळला जाणार आहे. यानंतर 25 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. यातील पहिला सामना ऑकलंडच्या इडन पार्कवर, दुसरा सामना 27 नोव्हेंबरला हॅमिल्टनच्या सेडन पार्कमध्ये आणि अंतिम सामना 30 नोव्हेंबरला क्रिस्टचर्चच्या हॅग्ले ओव्हलमध्ये खेळले जाणार आहेत.
या मालिकांसाठी दोन्ही संघ-
भारत वनडे – शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाझ अहमद, रिषभ पंत, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चाहर, उमरान मलिक, कुलदीप सेन.
भारत टी20 – शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत, संजू सॅमसन, इशान किशन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड टी20 – केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेवॉन कॉनवे (विकेटकीपर), लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, ऍडम मिल्ने, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर
न्यूझीलंड वनडे – केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, ऍडम मिल्ने, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी Hardik Pandya & Kane Williamson Crocodile Bike Ride In Wellington
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
NZvIND: जाणून घ्या भारत-न्यूझीलंड टी20 मालिकेचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर
वनडे क्रिकेटमध्ये ‘नर्व्हस नाइंटी’चे शिकार होणाऱ्या अनलकी फलंदाजांची संपूर्ण यादी