---Advertisement---

हार्दिक पंड्याने घेतला मोईन अलीचा भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

On: रविवार, मार्च 28, 2021 9:50 PM
---Advertisement---

पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे ३ सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडला ३३० धावांचे आव्हान दिले होते. यावेळी भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने मोईन अलीचा शानदार झेल घेतला. त्याच्या झेलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

झाले असे की भारताने दिलेल्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे ५ फलंदाज १५५ धावांवरच बाद झाला. त्यामुळे मोईन अलीला फलंदाजीला यावे लागले. त्याने इंग्लंडकडून झुंज देताना त्याने २५ चेंडूत २९ धावांची खेळी केली. तो आता खेळपट्टीवर टिकेल असे वाटत असतानाच ३१ व्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर त्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न केला. पण मिड-ऑफला क्षेत्ररक्षण करत असलेल्या हार्दिकने अप्रतिम झेल घेतला. ज्यामुळे मोईन अलीला बाद व्हावे लागले.

त्याच्यापूर्वी जेसन रॉय(१४), जॉनी बेअरस्टो(१), बेन स्टोक्स (३५), जॉस बटरल(१५) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (३६) यांनी विकेट गमावल्या होत्या.

https://twitter.com/viratian18183/status/1376188175014535173

https://twitter.com/PRATIKLAWALE1/status/1376193202877689858

 

हार्दिकने सोडला होता स्टोक्सचा झेल

इंग्लंडच्या डावात ५ व्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर स्टोक्सने मोठा फटका मारला, या फटक्याने चेंडू लाँग ऑनला गेला. तिथे उभ्या असलेल्या हार्दिकच्या हातून हा चेंडू निसटला. त्यामुळे स्टोक्स १५ धावांवर बाद होता होता वाचला होता.

भारताचे इंग्लंला ३३० धावांचे आव्हान

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रण दिले. भारताने याचा फायदा घेत ४८.२ षटकात सर्वबाद ३२९ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून शिखर धवन(६७), रिषभ पंत(७८) आणि हार्दिक पंड्याने(६४) अर्धशतके केली. तसेच इंग्लंडसाठी सर्वाधिक ३ बळी वेगवान गोलंदाज मार्क वूडने टिपले. लेग स्पिनर आदिल रशीदने दोन बळी आपल्या नावे केले. सॅम करन, मोईन अली, रिस टोप्ली, लियाम लिव्हींगस्टोन व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या –

भुवनेश्वर कुमारच्या अप्रतिम चेंडूवर पहिल्याच षटकात ३ चौकार ठोकणारा जेसन रॉय क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ

अरे वा! ४५ वर्षात भारताविरुद्ध असं पहिल्यांदाच घडलंय, इंग्लिश गोलंदाजांचा अनोखा कारनामा

‘गब्बर’ने घेतला स्टोक्सचा अफलातून झेल, पंड्याने जोडले हात, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---