पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विजयी षटकार मारणाऱ्या हार्दिक पंड्याच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूही चेंडूप्रमाणे उंचीवर गेली आहे. झाले असे की युएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक (Asia Cup) 2022च्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत केले. रविवारी (28 ऑगस्ट) झालेल्या या टी20 प्रकारच्या सामन्यात हार्दिकने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने संघाच्या वियजामध्ये मोलाची भुमिका पार पाडली आहे.
रिपोर्टनुसार, पंड्याची ब्रॅण्ड मॅनेजर राईज (RISE) स्पोर्टसने म्हटले, मागील काही दिवसांमध्ये 6 ते 7 ब्रॅण्ड्सच्या कंपन्या भारताच्या या अष्टपैलू खेळाडूशी करार करण्यास उत्सुक आहेत. त्याची एंडोर्समेंट फि पण आभाळाला पोहोचली आहे. तो एका दिवसाला जवळपास दोन कोटी रूपये फि घेतो.
30 ते 40 टक्क्यांनी वाढली ब्रॅण्ड व्हॅल्यू
रिपोर्टनुसार, हार्दिकच्या ब्रॅण्ड्सच्या व्हॅल्यूमध्ये 30 ते 40 टक्क्यांनी वाढली आहे. तो प्रत्येक ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी दोन दिवस घेतो. यावरून त्याची एंडोर्समेंट फि चार कोटी एवढी होते. सध्या त्याने 8 ते 10 ब्रॅण्ड्ससोबत करार केला असून त्यामध्ये आता आणखी 6 ते 7 ब्रॅण्ड्सची भर पडण्याची शक्यता आहे. तर त्याची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.
हार्दिकमार्फत सोशल मीडियावर केलेल्या कोणत्याही प्रचाराच्या एका पोस्टची फि 40 लाख रूपये आहे. तसेच तो सध्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक फॉलोअर्स असणारा भारतीय क्रिकेटपटू आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर लगेचच हार्दिकला मेन्स लाइफस्टाइल आणि विलेन यांचे ब्रॅण्ड एंबेसेडर घोषित केले गेले आहे. इंडियान प्रीमियर लीगमधील गुजरात टाइटन्सचा विजेता कर्णधाराच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तो सध्या बोट (boAT), मॉन्स्टर एनर्जी, गल्फ ऑइल आणि ड्रीम 11 शी करारबद्ध आहे.
हार्दिकची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी
हार्दिकने गोलंदाजी करताना 4 षटकात 25 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीत नाबाद 33 धावा केल्या. त्याने रविंद्र जडेजासोबत 52 धावांची विजयी भागीदारीही केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: भज्जी शिकवू लागला श्रीसंतला गोल्फ; पाहा पुढे काय घडलं
टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली, दुखापतीमुळे महत्वाचा अष्टपैलू संघातून बाहेर
‘हार्दिक कर्णधाराला अनेक पर्याय देतो’ गुजरातच्या सहकाऱ्याने पंड्याबाबत केलंय खास विधान