ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याने घोट्याच्या दुखापतीमुळे झिम्बाब्वे संघाविरुद्ध खेळली जात असलेल्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. तसेच आगामी काळात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून देखील तो बाहेर झाला आहे. संघातून बाहेर पडल्यानंतर मार्श आता पर्थसाठी रवाना होणार असल्याचे सांगितले गेले आहे.
यावर्षी होणारा आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 WC2022) ऑस्ट्रेलियात होणार आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघासाठी विश्वचषक स्पर्धेत मिचेल मार्श (Mitchell Marsh) महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. याच पार्श्वभूमीवर या प्रमुख स्पर्धेआधी त्याने दुखापतीतून सावरणे ऑस्ट्रेलियन संघासाठी महत्वाचे असेल. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ (Steve Smith) याने याविषयी प्रतिक्रिया देखील दिली.
स्मिथ म्हणाला की, “मार्शने नुकतेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. आम्ही संघात ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात अष्टपैलू खेळाडू घेतले, तो त्या संघाचा एक महत्वाचा भाग होता. हे मिचेलसाठी निराशाजनक आहे, पण काही महत्वाच्या बाबी (दुखापत) समोर आल्या आहेत. तो मागच्या वर्षी टी-20 विश्वचषक अभियानाचाही महत्वाचा भाग होता. मला विश्वास आहे की, यावर्षीही संघात त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. त्याला यासाठी (टी-20 विश्वचषकासाठी) ठीक करणे, ही प्राथमिकता असेल.”
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जरी मार्श अपस्थित राहू शकला नाही, तरी भारताविरुद्धच्या होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी तो संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका 20 सप्टेंबर रोजी मोहालीमध्ये सुरू होईल. तोपर्यंत मार्शच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज जोश इंगलिस याला संघात बदली खेळाडू म्हणून स्थान दिले जाणार असल्याचेही सांगितले गेले आहे. इंगलिस झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड संघाविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघासोबत असेल. इंगलिस द हंड्रेड लीगमध्ये लंडन स्पिरिट्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. द हंड्रेडच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी लंडन संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्याने लंडन संघात ग्लेन मॅक्सवेलची जागा भरून काठली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘मी संघासाठी मौल्यवान खेळाडू ठरू शकतो!’ स्टीव्ह स्मिथचे बडेबोल
Asia Cup 2022: केएल राहुलसाठी शेवटची संधी? टीम इंंडियाचे समीकरण बिघडतयं
सेहवागने काढला बाप, अख्तरला चढला संताप! म्हणाला, ‘असं बोलला असता तर…’