मुंबई। भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना जबरदस्त कामगिरी केली आहे. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने बडोदा संघाकडून खेळताना मुंबई विरुद्धच्या सामन्यात पाच विकेट्स घेण्याची कमाल केली आहे.
हार्दिकने या सामन्याच्या पहिल्या दिवसात 74 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या दिवशी अजून दोन विकेट्स घेतल्या. यामुळे मुंबईचा संघ 465 धावांवर सर्वबाद झाला.
या सामन्यात त्याने मुंबईची सलामीजोडी आदित्य तरे (15) आणि विलास औटी (12) या लवकर बाद केले. नंतर शिवम दुबे, आकाश पारकर आणि रॉयस्टन दियास यांना बाद करत प्रथम श्रेणीत तिसऱ्यांदाच पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली. या सामन्यात त्याने 81 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.
हार्दिकची न्युझीलंडमधील वन-डे सामन्यात इंडिया ए संघात निवड झाली होती. मात्र त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास रूची दाखवली.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या एशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक दुखापतग्रस्त झाला होता. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यात याची कमी नक्कीच जाणवत असेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–लग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला
–मुरली विजय- केएल राहुल टीम इंडियासाठी खरोखर फीट आहेत का?
–निवृत्तीची चर्चा असणारा खेळाडूच बनला श्रीलंकेचा कर्णधार