आयपीएल २०२२चा २१वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने शानदार फलंदाजी प्रदर्शन करत खास शतक केले आहे.
या सामन्यात (SRH vs GT) नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम गोलंदाजी निवडली होती. त्यामुळे गुजरातचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. मात्र गुजरातची वरची फळी हैदराबादच्या गोलंदाजांपुढे सपशेल फेल ठरली. मात्र पुढे कर्णधार हार्दिकने (Hardik Pndya) संघाचा डाव सावरला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने काही आकर्षक फटके मारत संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली.
यादरम्यान हार्दिकच्या बॅटमधून एक शानदार षटकारही (Hardik Pandya 100 Six In IPL) निघाला. हा षटकार त्याच्यासाठी विक्रमी ठरला आहे. त्याने या षटकारासह त्याचे आयपीएलमधील १०० षटकार पूर्ण केले आहेत. तसेच तो सर्वात कमी चेंडूंचा सामना करताना आयपीएलमध्ये सर्वात वेगवान १०० षटकार ठोकणारा पहिलाच भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. आयपीएलमधील १००० षटकार पूर्ण करण्यासाठी त्याने एकूण १०४६ चेंडूंचा सामना केला आहे.
हार्दिकपूर्वी आंद्रे रसेल आणि ख्रिस गेल यांनी सर्वात कमी चेंडू खेळताना हा पराक्रम केला होता. रसेलने केवळ ६५७ चेंडूंचा सामना करताना षटकारांचे हे खास शतक केले होते. तर गेलने यासाठी ९४३ चेंडू खेळले होते.
आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूंचा सामना करताना १०० षटकार (Balls Faced For 100 Sixes In IPL)-
६५७ चेंडू: आंद्रे रसेल
९४३ चेंडू: ख्रिस गेल
१०४६ चेंडू: हार्दिक पंड्या*
१०९४ चेंडू: किरॉन पोलार्ड
१११० चेंडू: ग्लेन मॅक्सवेल
Milestone ???? – Hardik Pandya becomes the fastest Indian to hit 100 sixes in IPL in terms of balls.#TATAIPL #SRHvGT pic.twitter.com/oy0opoW5yN
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2022
याखेरीज आयपीएल २०१५ नंतर १०० किंवा त्यापेक्षा षटकार मारणाराही हार्दिक आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. या खास यादीत केएल राहुल, विराट कोहली, संजू सॅमसन, रिषभ पंत, एमएस धोनी, रोहित शर्मा, अंबाती रायुडू आहेत.
असे आहेत दोन्हीही संघ-
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, केन विलियम्सन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्करम, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन, उमरान मलिक, टी नटराजन
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा नायक ठरलेला ‘रीवा एक्सप्रेस’, वडील चालवतात हेअर सलून; वाचा त्याची कहाणी
कुलदीप यादवला मिळाला नवा ‘धोनी’, यष्टीमागून करतोय मदत; जाणून घ्या कोण आहे तो?
SRH vs GT: हैदराबादचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा उभय संघांची प्लेइंग इलेव्हन






