येत्या काही दिवसात भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मलिकेसाठी बीसीसीआयने युवा खेळाडूंचा संघ श्रीलंकेला रवाना केला आहे. यामध्ये शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे आणि हार्दिक पंड्यासारखे अनुभवी खेळाडू देखील आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पंड्याचे दुखापतीमुळे संघात येणे जाणे सुरू आहे. अशातच श्रीलंका दौऱ्यावर तो फलंदाजीसह गोलंदाजी विभागातही चांगली कामगिरी करेल का? याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
हार्दिक पंड्या गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकत नव्हता. परंतु तो आता गोलंदाजी करणार आहे. याबाबत बोलताना विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने म्हटले की, “पंड्याने नेट्समध्ये आणि इंट्रास्क्वाड सराव सामन्यात गोलंदाजी केली आहे. परंतु हे त्याच्यावर आणि संघ व्यवस्थापकांवर निर्भर करते की, त्याला कशाप्रकारे खेळवायचे. त्याने गोलंदाजी तर केली आहे, जी संघासाठी सकारात्मक बाब आहे.”(Hardik Pandya does bowling during Indian teams net session)
तसेच तो पुढे म्हणाला की, “पंड्याने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत गोलंदाजी केली होती. परंतु आयपीएल स्पर्धेत गोलंदाजी केली नव्हती. कारण तो त्याचा आणि संघ व्यवस्थापकांचा निर्णय होता.”
काय म्हणाला होता पंड्या?
पंड्याने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या ५ टी-२० सामन्यात १७ षटके गोलंदाजी केली होती. ज्यामध्ये त्याने ३ गडी बाद केले होते. याबरोबरच त्याने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत ९ षटके गोलंदाजी केली होती. त्याने नुकत्याच टाइम्स ऑफ इंडियाच्या स्पोर्ट्स कास्टमध्ये म्हटले होते की, “माझे लक्ष येत्या टी२० विश्वचषक स्पर्धेवर आहे. मला ही खात्री पटवून द्यायची आहे की, मी विश्वचषक स्पर्धेपर्यंत गोलंदाजी करू शकेल. मला ही संधी गमवायची नाही.”
हार्दिक पंड्याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत एकूण ४८ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याला १९.७५ च्या सरासरीने ४७४ धावा केल्या आहेत. तसेच ६० वनडे सामन्यात १२६७ धावा चोपल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
रोहित अन् ‘हा’ फलंदाज करणार ओपनिंग, शॉला इंग्लंडला पाठवण्याची मागणी निवडकर्त्यांनी फेटाळली!
इंग्लंड संघात कोरोनाची एंट्री, भारतीय खेळाडूंच्या बचावासाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय; करणार ‘हे’ काम
तब्बल ३५० वनडे सामने खेळणाऱ्या धोनीबद्दल ‘या’ गोष्टी क्रिकेटप्रेमीला माहित हव्याच!