भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे साजेशे प्रदर्शन करताना दिसत नाहीये. टी२० विश्वचषक २०२१, त्यानंतर आयपीएल २०२१ मध्ये विशेष कामगिरी न करू शकलेला हार्दिक सध्या क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे तो त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवतो आहे. यादरम्यान तो सोशल मीडियावरही अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्याने नुकताच त्याचा मुलगा (Hardik Pandya’s Son) अगस्त्य (Agastya Pandya) याच्यासोबत फलंदाजी करत असतानाचा (Batting With Son Agastya) व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हार्दिकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दिक त्याच्या लहानग्या मुलासोबत अगदी लहान मुलाप्रमाणे मस्ती करतो आहे. हार्दिकने अगस्त्यच्या हातात प्लास्टिकची छोटी बॅट दिली आहे. आणि तो स्वत अगत्स्यचा हात पकडून त्याच्याकडून फलंदाजी करून घेतो आहे. या फलंदाजी करत असलेल्या बाप-लेकाच्या जोडीला कृणाल पंड्या (Krunal Pandya) नेही चांगली साथ दिली आहे. तो या व्हिडिओत गोलंदाजी करताना दिसतो आहे.
काका कृणालच्या एका चेंडूवर हेलिकॉप्टर शॉट मारत अगस्त्य खूप खूश झाल्याचेही पाहायला मिळत आहे. याखेरीज त्याने हार्दिकला गोलंदाजीही केली आहे. आपण टाकलेल्या प्रत्येक चेंडूनंतर तो स्वतच आनंदी होत टाळ्या वाजवताना दिसतो आहे. हार्दिक आणि अगस्त्यचा हा गोड असा व्हिडिओ सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या पसंतीस उतरताना दिसतो आहे.
हेही वाचा- हार्दिक पंड्याची चाहत्यासोबतची वर्तवणूक पाहून नेटकरी ‘गुश्श्यात’, म्हणाले, ‘भाऊ जुणे दिवस विसरला’
हार्दिकने हा व्हिडिओ शेअर करताना त्यावर लक्षवेधी असे कॅप्शनही दिले आहे. ‘घरी बॉक्सिंग डेची तयारी,’ असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हार्दिकच्या या व्हिडिओवर त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकने दिलचा इमोजी टाकला आहे.
दरम्यान भारतीय संघ सध्या सेंच्यूरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळत आहे. हार्दिक या दौऱ्याचा भाग नसला तरीही त्याने आपल्या व्हिडिओला असे कॅप्शन देत आपण घरी एकप्रकारे बॉक्सिंग डे कसोटीचा आनंद घेत असल्याचे तो सांगू इच्छित असावा.
महत्त्वाच्या बातम्या-
‘धोनीने जेव्हा कसोटीतून निवृत्ती घेतली, तेव्हा खेळाडूंना बसलेला धक्का’, माजी प्रशिक्षकाचा खुलासा
शेरास सव्वाशेर! २०२१ मधील ४ घटना, जेव्हा भारतीय खेळाडूंनी विरोधी क्रिकेटर्सला दिलेले जशास तसे उत्तर
अविस्मरणीय २०२१! यावर्षीचे क्रीडा क्षेत्रातील ५ खास क्षण, जेव्हा कोट्यवधी भारतीयांची उंचावली मान
हेही पाहा-