भारतीय संघाला सध्या न्यूझीलंड दौऱ्यातील (Tour of New Zealand) कसोटी मालिकेत संघर्ष करावा लागत आहे. यादरम्यान आता भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पाठीच्या दुखापतीतून बरा झाला आहे. आता तो पाच महिन्यांनंतर मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 26 वर्षीय पंड्या डी.वाय. पाटील. टी20 स्पर्धेत (D.Y. Patil T20 Tournament) रिलायन्स वनसाठी (Reliance One) खेळताना दिसणार आहे. तो 25 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत 3 सामने खेळणार आहे.
यावेळी एका सूत्राने सांगितले की, “होय. पंड्याला रिलायन्स वन या संघात सामील केले आहे. तो डी. वाय. पाटील. स्पर्धेत खेळणार आहे. परंतु पंड्या सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) सराव करत आहे. त्यामुळे आधी एनसीएने त्याला मुक्त करणे गरजेचे आहे.”
त्याने आपली तंदुरुस्ती सिद्ध केल्यास 12 मार्चपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड होऊ शकते.
22 सप्टेंबर 2019 ला बेंगळुरु येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पंड्या भारतीय संघाकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला होता. आतापर्यंत पंड्याने 11 कसोटी सामने, 54 वनडे सामने आणि 40 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.
केवळ दुसऱ्यांदाच 'कॅप्टन' कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा झाला 'असा' पराभव
वाचा👉https://t.co/rtdiLgEdpl👈#म #मराठी #cricket #INDvsNZ #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 24, 2020
कसोटी चॅम्पियनशीपमधील टीम इंडियाचा पहिला पराभव; जाणून घ्या किती आहेत गुण
वाचा👉https://t.co/MR3sRkDtuq👈#म #मराठी #cricket #INDvsNZ #TeamIndia #TestChampionship— Maha Sports (@Maha_Sports) February 24, 2020