भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजावर बोचरी टीका केली होती. जडेजामध्ये सामना जिंकवून देण्याची क्षमता नसून त्याला संघात स्थान देऊ नये, असेही मत मांजरेकरांनी व्यक्त केले होते. मात्र, तिसर्या वनडे सामन्यात जडेजाने तडाखेबंद अर्धशतक झळकावत या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले होते. चाहत्यांनी देखील या प्रकरणात मांजरेकरांची खिल्ली उडवत त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले.
आता काहीसा असाच प्रसंग अजून एका खेळाडूच्या बाबतीत घडला आहे. तो खेळाडू म्हणजे हार्दिक पंड्या. रवींद्र जडेजावर टीका करताना संजय मांजरेकरांनी हार्दिक पंड्याच्या संघातील स्थानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विशेषज्ञ फलंदाज म्हणून मी हार्दिकला संघात कधीही स्थान देणार नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, हार्दिक पंड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरल्यानंतर मांजरेकरांनी विधान मागे घेत असल्याचे म्हटले आहे.
“हार्दिकने आपल्या कामगिरीने माझे विधान मागे घ्यायला भाग पाडले”
हार्दिक पंड्याच्या मालिकेतील दमदार कामगिरीनंतर संजय मांजरेकरांनी त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. हार्दिकने त्याच्या कामगिरीने मला माझे मत बदलण्यास भाग पाडले असे म्हणत मांजरेकरांनी आता हार्दिकला फलंदाजीच्या क्रमात गरज पडल्यास बढतीही द्यावी, असे सुचविले आहे.
“मी आयपीएलच्या कामगिरीवरून संघनिवड करू नये, असं म्हणत होतो. माझ्यामते हार्दिक हा उत्तम टी-२० फलंदाज असला, तरी वनडे क्रिकेट हा वेगळा प्रकार असतो. अशावेळी जर हार्दिक गोलंदाजीसाठी अनुपलब्ध असेल, तर त्याला केवळ फलंदाज म्हणून खेळविण्यापेक्षा त्याच्या जागी मनीष पांडेला संधी द्यावी, असे मला वाटत होते. मात्र, त्याने आपल्या कामगिरीने सगळीच गृहीतके खोटी ठरवली”, असे मांजरेकर पुढे म्हणाले.
भारताकडून मालिकेत सर्वाधिक धावा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा काढण्याचा मान हार्दिक पंड्याने पटकाविला. त्याने ३ सामन्यांत १०५ च्या सरासरीने २१० फटकाविल्या, ज्यात तिसर्या सामन्यातील ७६ चेंडूंतील ९२ धावांच्या तुफानी खेळीचाही समावेश होता. याच खेळीसाठी हार्दिक पंड्याला सामनावीराच्या पुरस्काराने देखील गौरविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘स्विच हिटवर बंदी आणा’, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची आयसीसीकडे संतप्त मागणी
१५ वर्षांच्या टी२० क्रिकेट इतिहासात कोणालाही न करता आलेला पराक्रम डेविड मलानने केलाय
…म्हणून मिशेल स्टार्क भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळला नाही, फिंचने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे ५ संघ; टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव