श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. संघाच्या कर्णधार नियुक्तीवरून चाहते दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. टी20 विश्वचषकातील शानदार कामगिरीनंतरही हार्दिक पांड्याला कर्णधारपद देण्यात आलेलं नाही. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवची वर्णी लागली आहे. आश्चर्याचं म्हणजे, हार्दिक पांड्याकडून उपकर्णधारपदही काढून घेण्यात आलंय. त्यामुळे आता त्याच्या मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हार्दिक पांड्या आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केलं होतं. त्याला रोहित शर्माच्या जागी संघाचा कर्णधार बनवण्यात आलं. मात्र आता मुद्दा हा आहे की, भारतीय टी20 संघाचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादव देखील मुंबई इंडियन्सकडूनच खेळतो. आयपीएल 2025 पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. अशा परिस्थितीत मुंबईला सूर्याला रिटेन करण्यासाठी मोठी ऑफर द्यावी लागू शकते.
मात्र बीसीसीआयनं अद्याप स्पष्ट केलेलं नाही की, एक टीम किती खेळाडूंना रिटेन करू शकते. रिपोर्टनुसार, एक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडूंना रिटेन करू शकते, ज्यामध्ये 3 भारतीय आणि एका विदेशी खेळाडूचा समावेश असेल. जर असं झालं, तर मुंबई इंडियन्ससमोर सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहला रिटेन करण्याचा पर्याय खुला असेल. विशेष म्हणजे, आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिल्यामुळे मुंबई इंडियन्समधील वातावरण खराब झालं असल्याची बातमी आली होती.
हार्दिक पांड्याला भारतीय संघाचं कर्णधारपद मिळालं नसल्यामुळे त्याच्या संघातील स्थानावरही गदा येऊ शकते. जर हार्दिक श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करू शकला नाही, तर त्याचं काय होईल? हा मोठा प्रश्न आहे. गौतम गंभीर हेड कोच बनल्यानंतर भारतीय संघात अनेक बदल घडत आहेत. त्यामुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हार्दिकनं भाग न घेणं, हे त्याच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या या चॅम्पियन संघावर अदानी ग्रुपची नजर, लवकरच विकत घेणार मालकी हक्क
गौतम गंभीर हेड कोच बनताच केकेआरच्या खेळाडूंची चांदी, दोघांची थेट भारतीय संघात एंट्री
“त्याचं शुबमन गिलसारखं नशीब कुठे…”, माजी मुख्य निवडकर्त्याचे भारतीय संघ व्यवस्थापनावर ताशेरे