पंधराव्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामन्याचा पहिला संघ मिळाला आहे. मंगळवारी (२४मे) कोलकाताच्या इडन गार्डनवर पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. या सामन्यात गुजरातने राजस्थानवर ७ विकेट्सने विजय मिळवत २९ मेला होणाऱ्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
राजस्थानने दिलेल्या १८९ धावांचा लक्षाचा पाठलाग करताना गुजरातने तीन चेंडू राखून हा विजय मिळवला आहे. आयपीएल पदार्पणाच्या हंगामातच गुजरातने अंतिम फेरी गाठल्याने कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) या विजयी प्रवासाचे श्रेय त्याने संघसहकाऱ्यांना आणि कुटुंबाला दिले आहे. या हंगामात त्याने अष्टपैलू कामगिरी करत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे.
या सामन्यानंतर पंड्या म्हणाला, “सध्या मी माझे जीवन संतुलित करण्यावर माझा कल दिला आहे. यामध्ये माझ्या कुटुंबाने माझा मुलगा, माझी पत्नी आणि माझा भाऊ यांनी मोठी भूमिका निभावली. कारण त्यांच्यामुळेच मी एक चांगला क्रिकेटर बनू शकलो. यामुळे मी त्यांचा आभारी आहे. आता मला त्यांच्यासोबत काही वेळ व्यतित करायचा आहे.”
“अंतिम ११ मध्ये सगळ्यांनाच येण्याची इच्छा असते. त्यामुळे सगळेच खेळाडू त्यांच्या विभागात उत्तम कामगिरी करत आहेत. त्यातच डेविड मिलरने केलेल्या फलंदाजीचा मला अभिमान आहे. राशिद खाननेही संपूर्ण हंगामात चांगली गोलंदाजी केली आहे”, असे म्हणत हार्दिकने संघाचे कौतुक केले आहे.
क्वालिफायर सामन्यात मिलरने ३८ चेंडूत नाबाद ६८ धावांची निर्णायक खेळी केली. यामध्ये त्याने ३ चाैकार आणि ५ षटकार मारले. तसेच चौथ्या विकेसाठी हार्दिकसोबत नाबाद १०६ धावांची भागीदारी केली. यावेळी हार्दिकने २७ चेंडूत ५ चाैकाराच्या मदतीने नाबाद ४० धावा केल्या. त्याचबरोबर त्याने देवदत्त पड्डीकलची विकेट देखील घेतली.
दुखापतीने नेहमीच त्रस्त असलेल्या हार्दिकने त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आहे. यावर तो चांगलाच यशस्वी झाला असून त्याची भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत संघात जागा मिळाली आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘फ्लाइंग कौर’ हरमनप्रितने हवेत झेपावत घेतला अप्रतिम झेल; पाहा व्हिडिओ
गुजरातच उचलणार आयपीएल ट्रॉफी? आकडेवारी देतायेत ग्वाही, तब्बल १० वेळा झालंय ‘असं’
असं काय घडलं? पंड्या, बटलर, मिलरबरोबरच केवळ ३ धावा करणाऱ्या जयस्वालचे झाले जोरदार कौतुक; पाहा Video