भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील तिसरा टी२० सामना मंगळवार दिनांक १४ जून रोजी खेळला जाणार आहे. या मालिकेत ५ टी-२० सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेत खेळलेल्या गेलेल्या दोन्ही सामन्यात भारताला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. या पराभवाचे एक कारण म्हणजे केएल राहुलच्या मालिकेतून बाहेर पडल्यावर कर्णधारपद सांभाळण्याऱ्या रिषभ पंतचे काही आश्चर्यचकित करणारे निर्णय.
आयपीएल २०२२ मध्ये दिल्लीचा संघ ऊपांत्य फेरीमध्ये पोहोचली नाही यामुळे त्याच्यावर टीका होत असतानाच केएल राहुलच्या मालिकेतून बाहेर पडल्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी रिषभ पंतला देण्यात आली आहे. पंतने भारताचे कर्णधारपद मिळाले तेव्हा खुप विश्वासाने म्हणले होते की, आम्ही संघ म्हणुन चांगली कामगिरी करु. पण, त्याने कर्णधार म्हणुन घेतलेले काही निर्णय भारताला महागात पडले. पहिल्या टी२० सामन्यात युजवेंद्र चहलला फक्त २ षटके देण्यात आली परिणामी भारताला सामना गमवावा लागला. तसेच दुसऱ्या टी२० सामन्यात दिनेश कार्तिकच्या आधी फलंदाजी अक्षर पटेलला पाठवण्यात आले आणि ते संघाला चांगलेच भोवले.
परंतु, टीकेचा विषय केवळ कर्णधारपदाचा नसुन पंतच्या फॉर्मचा देखील आहे. पंतने आयपीएलमध्ये सुद्धा अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन केले नाही.ना त्याच्या बॅट मधुन सामना जिंकवणारी खेळी आली नाही. त्यामुळे संघात असलेल्या अनुभवी खेळाडुंचे मत आहे की, हार्दिक पंड्याला कर्णधारपद देण्यात यावे. राजस्थान रॉयल सोबत झालेल्या नो बॉल घटनेने त्याच्यावर जगभर टीका झाली. त्यामुळे त्याच्या नेतृत्व शैलीवर प्रश्न उभे झाले आहेत.
दरम्यान, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या मालिकेतील तिसरा टी२० सामना मंगळवारी विशाखापट्टनम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए मैदानावर खेळला जाणार आहे. या मैदानावरील याआधी झालेल्या सामन्यांचा विचार केल्यास भारतीय संघाची कामगिरी काही विशेष नाहीये. अशातच हा भारताला मालिकेतील पहिला विजय मिळवुन सर्वांचे तोंड बंद करण्याची संधी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सीरिज पाकिस्तान- विंडीजची अन् फटका बसलाय भारताला, वनडे रँकिंगमध्ये खाल्ल्या गटांगळ्या
काही कळायच्या आत डॅनीने करिष्माला उचलून घेतले, अन् ‘ते’ कांड झाले, जाणून घ्याच
भावड्याला आता तरी संघात खेळण्याची संधी द्या!, जहीर खानने केली ‘या’ खेळाडूला संघात घेण्याची मागणी