भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि धमाकेदार फंलंदाजी करणाऱ्या हार्दिक पंड्याने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खणखणीत शतक करून भारताला धावांचा डोंगर उभारून दिला. भारताकडून फलंदाजी करताना ८व्या क्रमांकावर येऊन त्याने सर्वात वेगवान शतक केले आहे. याच बरोबर त्याने भारताकडून खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक म्हणजेच २६ धावाही केल्या.
पुष्पकुमारा श्रीलंकेकडून ११६वे षटक टाकण्यासाठी आला तेव्हा भारताचा स्कोर ४३० वर ९ बाद सा होता आणि हार्दिक पंड्या ५७ धावांवर खेळत होता. सर्वानाच असे वाटले होते की आता श्रीलंका लवकरच शेवटची विकेट घेईल आणि भारताचा डाव संपुष्टात आणेल. पण हार्दिकच्या मनात काही औरच होते. त्याने या षटकात २ चौकार आणि ३ षटकार लगावले. या षटकानंतरच हार्दिकला आपले पहिले कसोटी शतक करू शकतो असा आत्मविश्वास आला.
या संपूर्ण षटकाच वार्तांकन…
११५. १ पुष्पकुमाराच्या फुल लेन्थ चेंडूवर हार्दिक पंड्याने बसून मिड ऑन आणि मिड विकेट यांच्यामध्ये चौकार लगावला.
११५. २ पुढच्याच चेंडूवर एक चौकार हार्दिकने पुढे येऊन पुष्पकुमाराच्या डाव्याबाजूने सरळ शॉट मारला. चेंडू एवढ्या वेगाने सीमारेषेपार गेला की लॉंग ऑफ वर असलेल्या फिल्डरला हलण्याची ही संधी मिळाली नाही.
११५. ३ पुन्हा एकदा हार्दिकने पुढे येऊन फटका मारला पण या वेळेला उंच आणि हवेत. षटकार. पुष्पकुमाराच्या डोक्यावरून चेंडू थेट स्लाईड स्क्रीन
वर.
११५. ४ हार्दिक पंड्याचा आणखीन एक षटकार, त्याच जागेवर पण हा फटका त्याने स्क्रिझमध्ये थांबून मारला. मागील षटकार उंच होता तर हा फ्लॅट.
११५. ५ षटकार,षटकार आणि पुन्हा एकदा षटकार!!! पंड्याच्या नावावर विक्रम. भारताकडून कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा. पुन्हा एकदा पुष्पकुमाराच्या डोक्यावरून
चेंड सीमेपार.
११६. ६ एक धाव घेण्याचा प्रयत्न पण यादवने परत पाठवले. आता पंड्याचे लक्ष असेल त्याचे पहिले कसोटी शतक.