हार्दिक पंड्या याने त्याच्या अष्टपैलू प्रदर्शनाने भारताला पाकिस्तानविरुद्धचा आशिया चषक 2022 मधील सामना जिंकून दिला. गोलंदाजी करताना त्याने 25 धावा खर्च करत पाकिस्तानच्या 3 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजी करताना त्याने 17 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी केली. तसेच खणखणीत षटकार मारत त्याने संघाला 5 विकेट्सने सामना जिंकून दिला. या अष्टपैलू प्रदर्शनाने त्याने लाखो हृदय तर जिंकलीच. याबरोबरच सामन्यादरम्यान पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याच्यासोबत ब्रोमान्स दाखवत कोट्यवधी मनांना भुरळ पाडली.
पाकिस्तानचा यष्टीरक्षक आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) व भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसते की, हार्दिक रिझवानचा गळा पकडत आहे. परंतु हार्दिकने रिझवानचा गळा रागाने पकडला नसून हा फक्त मौजमजेचा भाग होता.
हार्दिकने मजेत रिझवानची गळाभेट (Hardik Pandya Hugs Mohammad Rizwan) घेतली होती. भारताची फलंदाजी सुरू असताना हा प्रसंग घडला होता. यष्टीमागे उभा असलेल्या रिझवानला फलंदाजी करत असलेल्या हार्दिकने मागून गळ्यात हात घालत मिठी मारली होती. यावेळी हार्दिक रिझवानला काहीतरी बोलतानाही दिसला. हार्दिकच्या या खिलाडीवृत्तीचे (Hardik Pandya Sportsmanship) सोशल मीडियावर भरपूर कौतुक होत आहे. एक मित्र आपल्या जिगरी मित्राला जसे बोलतो, त्या क्षणाशी या प्रसंगाची तुलना केली जात आहे.
Sportmanship! 💗
When Hardik hugged Rizwan. #AsiaCup2022 #INDvsPAK pic.twitter.com/OdK60Bx2hs— Naimisha (ନୈମିଷା) 🇮🇳 (@SpeakNaimisha) August 28, 2022
They are spreading love..♥️🥹
Moment of the Match 🔥#INDvsPAK #hardik #rizwan pic.twitter.com/hrvHgEa8Ka— _Laiba.ijaz 🇵🇰 (@Laibaijaz19) August 28, 2022
Hardik Pandya is the all-rounder we need today. Bowled well, batting well, and is getting Rizwan to shut up. #INDvPAK pic.twitter.com/xtqzVTUBqx
— Iyeronical (@LosingMotion) August 28, 2022
Like how Kapil Dev & Imran Khan used to greet each other, Virat Kohli & Shaheen, We admire & love this moment when Hardik Pandya Hugs Muhammad Rizwan 🤗 Feels like world is not that bad at all! Thank you for the #Memories #AsiaCup2022 #IndiaVsPakistan 🇮🇳 🇵🇰 🇦🇪 pic.twitter.com/SDPazfH29X
— Sandeep Nandlal (@ishsagar) August 28, 2022
Hardik panday wins ❤️ Heart, hug Muhammad Rizwan during Match #INDvsPAK pic.twitter.com/EBmPfIXm1Z
— Aima 🦋 (@Aima_03) August 28, 2022
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा (India vs Pakistan) संघ 19.5 षटकातच 147 धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची वरची फळी विशेष प्रदर्शन करू शकली नाही. 89 धावांवर भारताचे आघाडीचे 4 फलंदाज माघारी परतले. मात्र रविंद्र जडेजा आणि हार्दिक या अष्टपैलूंनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या.
जडेजा 29 चेंडूत 35 धावा करून 20व्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद झाला. अशात हार्दिकने मॅच फिनिशरची भूमिका बजावली. हार्दिकने शेवटच्या 4 चेंडूत संघाला विजयासाठी 6 धावांची गरज असताना धडाकेबाज शेवट केला. त्याने मोहम्मद नवाजच्या 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर खणखणीत षटकार मारत सामना जिंकून दिला. हार्दिकने ऑफ स्टंप्सच्या बाहेरून आलेल्या चेंडूवर पुल शॉट मारला आणि चेंडू षटकारासाठी पाठवला आणि सामना जिंकून दिला.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीने 100व्या टी20त केलाय भीमपराक्रम! धावांच्या त्या यादीत रोहितच्या स्पर्धकालाच टाकलं मागे
VIDEO: ‘भारत-पाकिस्तान सामन्यामुळे वैरीही बनले मित्र!’ जडेजा-माजरेंकरांचा झाला आमना सामना
भारत-पाक सामन्यात चहलच्या नावावर नकोसा विक्रम! इफ्तिकारने मारलेला षटकार पडला महागात