भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडून गुरुवारी क्रिकेट चाहत्यांना एक आनंदाची बातमी मिळाली. त्याची पार्टनर नताशा स्टॅन्कोव्हिकने एका मुलाला जन्म दिला. त्याचवेळी, पंड्याने आपल्या लहान मुलाचे फोटोही चाहत्यांसह शेअर केले. यादरम्यान त्याच्यावर संघसहकाऱ्यांबरोबरच चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षावर करण्यात आला. अशामध्ये नताशाचा एक्स बॉयफ्रेंड अली गोनी मागे न राहता त्यानेही नताशाला पुत्ररत्न प्राप्त झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
खरंतर अभिनेता अलीने (Aly Goni) नताशासोबतचा एक फोटो शेअर केला असून त्याने लिहिले की, “अरे मम्मी बन गई… नताशा आणि हार्दिक पंड्या तुम्हाला शुभेच्छा…” त्याने हा फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वीच ३१ मेला हार्दिक आणि नताशाने ते दोघे आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी नताशाच्या बेबी शॉवरचे फोटोही शेअर केले होते.
यापूर्वीही नताशा (Natasha Stankovic) जेव्हा गरोदर असल्याची माहिती दिली होती, तेव्हाही अलीने तिच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले होते की, “गॉड ब्लेस यू.”
https://www.instagram.com/p/CDVV1ZCF7E0/?utm_source=ig_web_copy_link
खरंतर पंड्याने (Hardik Pandya) नताशाबरोबर काही दिवसांपूर्वी ४ फोटो शेअर केले होते. त्यामधील एका फोटोत नताशा गरोदर दिसत होती. पंड्या आणि नताशाने जानेवारीच्या सुरुवातीला साखरपुडा केला होता. पण त्या दोघांचे लग्न झाले की नाही याबाबत कोणालाही स्पष्ट कल्पना नाही. या दोघांचाही हवनजवळ बसलेला फोटो समोर आले असले तरी या जोडप्याने लग्नाला दुजोरा दिला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
-असा एक दूर्दैवी क्रिकेटपटू जो आज असता एक महान अष्टपैलू, पण तेव्हा…
-अनिल कुंबळेनी ‘मंकीगेट’ प्रकरणावर केले मोठे भाष्य; म्हणाला…
-वाढदिवस विशेष : आपले रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवणारा वेस्ट इंडिजचा दिलदार दिग्गज