मुंबई। भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना चमकदार कामगिरी केली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याकडून खेळताना त्याने या सामन्यात मुंबईच्या पहिल्या डावात 81 धावा देत 5 विकेट्स घेतल्या तसेच अर्धशतकी खेळीही केली आहे.
यावेळी हार्दिकने 137 चेंडूंचा सामना करत 73 धावा केल्या. त्यात त्याने 9 चौकार आणि 1 षटकार मारला. याआधी त्याने मुंबईच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेतल्या आहेत. दोन्ही वेळेला हार्दिकने मुंबईचा सलामीवीर आदित्य तरेला बाद केले आहे.
वरिष्ठ संघातून तीन महिने दुखापतीमुळे बाहेर असलेल्या हार्दिकने जबरदस्त पुनरागमन करत अष्टपैलू खेळी केली आहे. याबरोबरच त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध जानेवारी महिन्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी तयार असल्याचे सिद्ध केले आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या एशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक दुखापतग्रस्त झाला होता.
हार्दिक बरोबरच आदित्य वाघमोडे (114) आणि विष्णू सोलंकी (133) यांनीही शतकी खेळी करत मुंबईच्या 465 धावांना प्रत्युत्तर दिले. या सामन्यात बडोद्याने पहिल्या डावात 436 धावा केल्या आहेत.
तसेच मुंबईने दुसऱ्या डावात 4 विकेट्स गमावत 116 धावा केल्याने ते 145 धावांनी आघाडीवर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–पंजाबच्या ‘ज्यूनियर युवराज’ने द्विशतक करत केली या मोसमातील सर्वोत्तम खेळी
–आयपीएल लिलावाच्या एक दिवसाआधीच युवराज सिंगची दमदार अष्टपैलू कामगिरी
–‘हे कधी, केव्हा आणि कशासाठी ?’, हरभजनचा सायमंड्सला प्रश्न