नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने काल (७ जुलै) आपला वाढदिवस साजरा केला. यादरम्यान केवळ देशभरातच नव्हे, तर जगभरातून त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. परंतु भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या तर धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बडोदाहून चक्क धोनीच्या घरी रांचीला पोहोचला होता. पंड्याचा रांची विमानतळावरील व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंड्या भावंडे उपस्थित
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या (Krunal Pandya) दोघेही धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रांची येथे पोहोचले होते. दोन्ही भावंडांनी एका खासगी विमानाने बडोद्याहून रांचीला आले होते. हार्दिक धोनीला आपल्या कारकिर्दीतील सर्वात खास व्यक्ती मानतो. धोनीने कठीण काळात त्याची खूप मदत केली आहे. त्यामुळे कदाचित तो धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला.
धोनीला रात्री १२ वाजता दिल्या शुभेच्छा
हार्दिकने धोनीला रात्री १२ वाजताच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सोशल मीडियावर त्याने एका खास अंदाजात धोनीला शुभेच्छा दिल्या. त्याने लिहिले, “मेरे बिट्टू को चिट्टू की ओर से हॅप्पी बर्थडे. माझा मित्र ज्याने मला एक चांगला व्यक्ती बनण्यास मदत केली आणि कठीण काळात मला पाठिंबा दिला.”
https://www.instagram.com/p/CCT5FS_F8jS/?utm_source=ig_web_copy_link
धोनीला आपल्या कुटुंबाचा भाग मानतो हार्दिक
त्याने नुकत्याच एका मुलाखतीत म्हटले होते, की तो धोनीला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानतो. तो म्हणाला, “एमएस धोनी (MS Dhoni) माझ्या भावाप्रमाणे आहे. मला ते माझ्या कुटुंबाप्रमाणे आहे. मागील काही वर्षांपासून मी त्याच्या खूपच जवळ आलो आहे. त्याचा स्वभाव इतका फ्रेंडली असल्यामुळे मी आश्चर्यचकित झालो होतो. मी त्याला काहीही म्हणेल, तो हे थट्टा म्हणूनच घेईल. माझे त्याच्याबरोबर एक चांगले नाते आहे.”
https://www.instagram.com/p/CCV5xOgpn7B/?utm_source=ig_web_copy_link
धोनीच्या नेतृत्वात केले पदार्पण
हार्दिकने २६ जानेवारी २०१६ रोजी धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हार्दिकने आपला पहिला सामना ऍडलेड येथे खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाच्या टी२० सामन्यात त्याने पहिल्याच षटकात १९ धावा दिल्या होत्या. त्याने खुलासा करताना म्हटले होते, त्याला वाटले होते की त्याची कारकिर्द आता संपली आहे. परंतु धोनीने त्याच्यावर विश्वास दाखविला आणि त्याने ३७ देत २ विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे भारतीय संघाला विजय मिळाला होता. धोनीने त्याच्यावर विश्वास दाखविला, त्यामुळे तो आज इतका मोठा क्रिकेटपटू आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-टीम इंडियावर लागलेला ‘घरके शेर’ धब्बा पुसणारा दादा
-वाढदिवस विशेष- कर्णधारांचा कर्णधार – दादा..
-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …आणि पूर्ण टीमने गांगुलीला रडवले