---Advertisement---

हार्दिक पांड्याचा लव्ह लाईफ पुन्हा चर्चेत! माहिका शर्मा आधी या अभिनेत्रींसोबतही होतं नातं

On: मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025 8:31 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आपल्या क्रिकेटमधील कामगिरीसाठी चर्चेत असतोच, पण त्याच्याबद्दल त्याच्या लव्ह लाइफमुळेही नेहमीच चर्चा होते. सध्या हार्दिक पांड्याचं नाव प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्मा हिच्यासोबत जोडलं जात आहे. विशेष म्हणजे, हार्दिकने नुकतेच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून माहिकासोबतच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे.

लिशा शर्मा
हार्दिकचे पहिले नातं मॉडेल लिशा शर्मासोबत होतं. दोघांना अनेक पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. 2016 मध्ये त्यांचं नाव जोरदार चर्चेत होतं. पण करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दोघांनी वेगळी वाट धरली.

एली अवराम
स्वीडिश अभिनेत्री एली अवराम हिचंही नाव हार्दिकसोबत जोडलं गेलं होतं. ती हार्दिकच्या भावाच्या (क्रुणाल पांड्या) लग्नातही दिसली होती. मात्र 2018 पर्यंत हे नातं संपुष्टात आलं.

ईशा गुप्ता
2018 मध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता हिच्याशी हार्दिकचे नाव जोडले गेले. दोघांनी हे नातं कधीही जाहीरपणे मान्य केलं नव्हतं. ईशाने एका मुलाखतीत कबूल केलं होतं की ते दोघं जवळचे होते, पण नातं अधिक पुढे जाऊ शकलं नाही. हार्दिकचं नाव उर्वशी रौऊतेला हिच्यासोबतही जोडण्यात आलं होतं, पण तिनं ही अफवा फेटाळून लावली.

नताशा स्टेनकोविक
सर्बियन अभिनेत्री आणि डान्सर नताशाशी हार्दिकने 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान लग्न केलं. त्याच वर्षी त्यांना एक मुलगा झाला अगस्त्य. 14 फेब्रुवारी 2023 रोजी उदयपूरमध्ये त्यांनी पुन्हा लग्न केलं. मात्र, 2024 च्या जुलैमध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला.

जैसमीन वालिया
नताशासोबत विभक्त झाल्यानंतर हार्दिकचं नाव ब्रिटिश सिंगर जैसमीन वालिया हिच्यासोबत जोडलं गेलं. IPL सामन्यांदरम्यान ती स्टेडियममध्ये दिसली होती. ग्रीसमध्येही दोघांना एकत्र पाहिलं गेलं. मात्र 2025 च्या मध्यापर्यंत हे नातंही गुपचूप संपलं.

माहिका शर्मा
सध्या हार्दिक पांड्याच्या आयुष्यात माहिका शर्मा आली आहे. ती एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिनं रॅपर बादशाह आणि गुरु रंधावा यांच्या गाण्यांतही काम केलं आहे. हार्दिकने तिच्यासोबतचा फोटो शेअर करत हे नातं अधिकृत केलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---