भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने गेल्या काही वर्षात टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. परंतु त्याची कसोटी कारकिर्द जास्त विशेष राहिलेली नाही. असे असले तरी, पंड्याला इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु संघातील पहिल्या ११ खेळाडूंमध्ये त्याचे खेळणे कठीण झाले आहे. कारण पंड्या दुखपतीमुळे गोलंदाजी करू शकत नाही आणि फक्त फलंदाज म्हणून त्याला संघात स्थान मिळणे अवघड आहे. तरीही टी२० विश्वचषक २०२१ च्या दृष्टीने त्याला संघात सहभागी करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.
टी-२० विश्वचषकासाठी आहे मुख्य खेळाडू
माध्यमांतील वृत्तांनुसार, टी-२० विश्वचषक २०२१ ची ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या विश्वचषकात भारतीय संघासाठी पंड्या आणि जसप्रीत बुमराह हे महत्वाची भूमिका बजावू शकतात. यामुळेच त्यांचा वापर हा योग्यरित्या केला जाईल, असे संघ व्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयच्या एका अधाकाऱ्याने याबाबत माहिती दिली की, “पंड्या आणि बुमराह हे भारतीय टी२० विश्वचषक संघातील महत्त्वाचे खेळाडू आहेत. संघ व्यवस्थापनाला त्यांच्या फिटनेसवर लक्ष ठेवायचे आहे आणि त्यासाठी इंग्लंडचा भारत दौरा ही सुवर्णसंधी आहे. संघ या दोन्ही खेळाडूंना अतिशय सांभाळून योग्यजागी वापर करेल.”
वॉशिंग्टन सुंदर घेऊ शकतो हार्दिक पंड्याचे स्थान
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पदार्पण करणाऱ्या आणि गोलंदाजी तसेच फलंदाजीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर याला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत संधी दिली जाऊ शकते. पहिले दोन सामने चेन्नईमध्ये होणार असल्यामुळे फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल. तसेच सुंदरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये या मैदानावर भरपूर सामने खेळले आहेत. यामुळेच पंड्याऐवजी सुंदरचा संघात समावेश करण्याबाबत विराट कोहली आणि संघ व्यवस्थापक नक्की विचार करतील.
महत्त्वाच्या बातम्या-
“भारताप्रती तुझं प्रेम पाहून आनंद वाटला”, पीटरसनच्या ट्विटवर मोदींची मन जिंकणारी प्रतिक्रिया
रिषभ पंतची इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी 11 जणांच्या संघात जागा पक्की, विराटने दिली माहिती
व्वा रे व्वा! दुखापतीमुळे चेन्नई कसोटीतून बाहेर असलेल्या शमीने गुंतवले व्यवसायात मन, पाहा फोटो