भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या कुटुंबासोबत सुट्टी घालवत आहे. नुकतेच त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून यासंबंधीचे काही फोटो शेअर केले आहेत. आशिया चषकाद्वारे तो क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करेल. या स्पर्धेत तो पूर्णपणे नव्या लूकमध्ये दिसणार आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून यासंबंधीचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो एका नवीन हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे.
हार्दिकने एक नवीन इंस्टाग्राम पोस्ट केली असून त्यामध्ये, त्याचा हेअर स्टायलिस्ट अलीम हकीमही दिसून येतोय. हकीम याने सेल्फी घेतला असून हार्दिकच्या डोळ्यांवर सन ग्लासेस दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/ChToO4TqJD-/?igshid=YmMyMTA2M2Y=
हार्दिक या नव्या लूकमध्ये कमाल दिसत आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये कात्रीची इमोजी टाकली आहे. त्याची पोस्ट शेअर होताच अवघ्या एका तासात 3 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. चाहत्यांनाही हार्दिकचा हा लूक खूप आवडला असून, ते पोस्टवर मजेशीर कमेंट्स करत आहेत.
दुखापतीनंतर पंड्या मैदानात परतला तेव्हापासून तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये कर्णधार असताना त्याने पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सला विजेते बनवले. त्याने आयपीएलमध्ये ४०० हून अधिक धावा केल्या. त्याचबरोबर गोलंदाजीतही तो प्रभावी ठरला. वर्ल्डकप सुपर लीगमध्येही हार्दिकची बॅट जबरदस्त बोलते आहे. त्याने ९ सामन्यात ४७ च्या सरासरीने ३२९ धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान त्याला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली. आगामी आशिया चषकात त्याच्याकडून भारतीय संघाला पुन्हा एकदा चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. भारत पाकिस्तानविरुद्ध २८ ऑगस्ट रोजी आपल्या आशिया चषक अभियानाची सुरुवात करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणारा ‘हा’ भारतीय खेळाडू झिम्बाब्वेविरुद्ध करणार आंतरराष्ट्रीय पदार्पण?
VIDEO: मनिष पांडेचा झेल पाहून म्हणाल, “हाच भारताचा बेस्ट फिल्डर”