भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा मैदानावर आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी तर मैदानाबाहेर आपल्या हटके लूकसाठी ओळखला जातो. सध्या इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे तो आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामासाठी सराव करत आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तो एका हटके लूकमध्ये दिसून आला आहे, ज्याचा फोटो त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यावर त्याची पत्नी नताशाने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा हार्दिक पंड्या हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो काही-ना-काही शेअर करत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. नुकताच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नवीन लूकमध्ये दिसून आला आहे. या फोटोमध्ये त्याची हेअरस्टाइल वेगळी दिसून येत आहे. या फोटोवर कॅप्शन देत त्याने चांगल्या हेअरस्टाइलसाठी हेअर स्टायलिश आलिम हकीमचे आभार मानले आहेत. तसेच चाहते देखील या फोटोवर आपल्या प्रतिक्रीया देत आहेत. (Hardik Pandya new look photo went viral on social media)
पत्नी नताशाने देखील दिली प्रतिक्रिया
हार्दिक पंड्याचा हा हटके लूक पाहून पत्नी नताशा देखील भलतीच खुश झाली आहे. तिने या फोटोवर आपली प्रतिक्रिया देत, आग आणि हार्ट ईमोजी शेअर केला आहे. तसेच एका युजरने प्रतिक्रीया देत लिहिले की, “ईस्ट किंवा वेस्ट, हार्दिक इज द बेस्ट” तसेच दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “किलर लूक ब्रो..”
https://www.instagram.com/p/CSdtuKssmYQ/?utm_medium=copy_link
मुंबई इंडियन्स संघ युएईला होणार रवाना
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे उर्वरित हंगाम येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू सध्या मुंबईच्या जियो गार्डनमध्ये सराव करत आहेत. तर शुक्रवारी (१३ ऑगस्ट) मुंबई इंडियन्स संघ युएईला रवाना होणार आहे. युएईला गेल्यानंतर या खेळाडूंना विलगीकरणात राहावे लागणार आहे. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘अय्यो, नातं पक्कचं समजायच म्हणजे’! राहुलच्या शतकाने सुनिल शेट्टी इंप्रेस, दिली लक्षवेधी प्रतिक्रिया
लॉर्ड्समध्ये रोहित-राहुल जोडीचे वादळ, शतकी भागिदारी करत मोडला ‘हा’ ६९ वर्षे जुना विक्रम
चेन्नईमागून मुंबईची बाजी, धोनीच्या संघाला ‘या’ गोष्टीसाठी युएई सरकारकडून नकार; वाढल्या अडचणी