---Advertisement---

कृणाल पंड्याच्या घरी पूजेला दिसला नाही हार्दिक, नताशासोबत घटस्फोटानंतर भावांमध्ये वाढले मतभेद?

On: मंगळवार, सप्टेंबर 10, 2024 10:02 PM
---Advertisement---

देशभरात मोठ्या धूमधडाक्यात गणेश चतुर्थीचा सण साजरा होत आहे. बॉलीवूडपासून क्रिकेट जगतापर्यंत सर्वत्र या उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधानापर्यंत सर्वांनी आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या घरीही गणेशाची स्थापना करण्यात आली. मात्र यावेळी हार्दिक मुंबईत असतानाही तो कुठेच दिसला नाही. तो घरच्या गणपती पूजेलाही उपस्थित राहिला नाही. यामुळे नव्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुंबईत असूनही हार्दिकने पूजेला हजेरी लावली नाही
इतर क्रिकेटपटूंप्रमाणेच हार्दिक पांड्याच्या घरीही गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. हार्दिकची वहिनी पंखुरी शर्माने तिच्या इन्स्टाग्रामवर गणेश पुजेचा व्हिडिओ शेअर केला आहे. कृणाल आणि पंखुरी यांनी या पूजेसाठी किती भव्यदिव्य तयारी केली आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या पूजेत त्यांच्या जवळचे लोक सहभागी झाले होते. अगस्त्यही यावेळी पूजेत दिसला. अगस्त्यने आपल्या चुलत भावासह गणेशपूजा केली. पण कुणालचा लहान भाऊ हार्दिक कुठेच दिसला नाही. हार्दिक मुंबईत असतानाही गणपतीच्या आरतीला न येण्यामागे काही खास कारण होते की हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटानंतर दोन भावांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.

हार्दिक अजूनही अगस्त्यला भेटला नाही
दरम्यान, बऱ्याच दिवसांपासून हार्दिकचा मोठा भाऊ आणि वहिनी हार्दिकच्या कोणत्याही पोस्टला लाईक करताना दिसले नाहीत किंवा ते त्याच्यासाठी कोणतीही पोस्ट शेअर करत नाहीत. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नात हार्दिक कुटुंबासोबत शेवटचा दिसला होता. त्यानंतर मुंबईत असूनही हार्दिक त्याच्या कुटुंबासोबत दिसला नाही. तर गेल्या काही दिवसांपासून हार्दिकचा मुलगा अगस्त्य हा हार्दिकच्या घरीच राहत आहे. पण आतापर्यंत दोघेही एकमेकांना भेटल्याचे दिसत नाही. दोघांच्या भेटीचे फोटो किंवा व्हिडिओ समोर आले नाहीत.

हेही वाचा-

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनकडे नंबर 1 गोलंदाज बनण्याची संधी, घ्याव्या लागतील फक्त ‘इतक्या’ विकेट्स
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन बनला संघमालक, खरेदी केला ‘या’ टीमचा हिस्सा
ऑस्ट्रेलियाची मोठी खेळी, भारताविरुद्ध हा फलंदाज करणार सलामी बाॅर्डर-गावस्कर मालिकेसाठी संघाची नवी चाल?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---