हार्दिक पंड्या याने त्याच्या अष्टपैलू प्रदर्शनाने भारताला पाकिस्तानविरुद्धचा आशिया चषक 2022 मधील सामना जिंकून दिला. गोलंदाजी करताना त्याने 25 धावा खर्च करत पाकिस्तानच्या 3 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजी करताना त्याने 17 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी केली. तसेच खणखणीत षटकार मारत त्याने संघाला 5 विकेट्सने सामना जिंकून दिला. सामन्यानंतर त्याने आपल्या प्रदर्शनाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
सामन्यानंतर हार्दिकने (Hardik Pandya) सांगितले आहे की, त्याने शेवटच्या षटकात कशाप्रकारे मॅच विनिंग षटकार मारला?. तसेच अंतिम षटकात 7 ऐवजी 15 धावांची गरज असती तरीही आपण स्वत:ला त्यासाठी तयार ठेवले असते, असेही पंड्याने म्हटले आहे.
सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पंड्या म्हणाला की, “मला माहिती होते की, शेवटच्या षटकात एखादा युवा गोलंदाज (नसीम शाहन किंवा शाहनवाज दहानी) आणि डावखुरा फिरकीपटू (मोहम्मद नवाज) राहतील. आम्हाला विजयासाठी शेवटच्या षटकात 7 धावा काढायच्या होत्या. जरी आम्हाला 7 ऐवजी 15 धावांची गरज असती, तरीही मी स्वतला तयार ठेवले असते. मला माहिती होते की, 20व्या षटकात माझ्यापेक्षा पाकिस्तानचा गोलंदाज जास्त दबावात होता. म्हणून मी गोष्टी सोप्या बनवायचा प्रयत्न करत होतो.”
बीसीसीआय टीव्हीवर रविंद्र जडेजानेही हार्दिकला हाच प्रश्न विचारला. 20व्या षटकात विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर मी बाद झालो. यानंतर तू काय विचार करत होतास?
https://twitter.com/BCCI/status/1564107956358000640?s=20&t=Uk6lLeVMFFvq1fzgh6Xc4A
जडेजाच्या या प्रश्नाचे उत्तर देताना हार्दिक म्हणाला की, “7 धावा मला जास्त मोठ्या वाटत नव्हत्या. जर त्यावेळी 5 ऐवजी 10 क्षेत्ररक्षकही सीमारेषेवर असते, तरीही मी मोठा शॉट मारलाच असता. मला पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकाने कोणताही फरक पडत नव्हता. ज्याप्रकारे गोलंदाजाने क्षेत्ररक्षकांना सेट केले होते, त्यानुसार मला माहिती होते की, चेंडू बॅक ऑफ लेंथवरच जाईल.”
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
असे काय झाले की, हार्दिकने लाईव्ह सामन्यात पकडला रिझवानचा गळा! INDvsPAK मॅचमधील व्हिडिओ व्हायरल
भर सामन्यात पाकिस्तानची जर्सी घालून आला विराटचा जबरा फॅन! आता सोशल मीडियावर घालतोय राडा
तिकडे पाकिस्तान हारत होता, इकडे आझम फक्त रडायचा बाकी होता! ‘तो’ व्हिडिओ व्हायरल






