ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ आपला दुसरा सामना गुरुवारी (27 ऑक्टोबर) नेदरलँड्सविरूद्ध खेळणार आहे. हा सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला विश्रांती देणार असल्याचे चर्चासमोर येत आहे. मात्र, भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
मागील दोन दिवसांपासून माध्यमात येत असलेल्या बातम्यांमध्ये नेदरलँड्सविरूद्ध हार्दिक पंड्या याला भारतीय संघ व्यवस्थापन विश्रांती देणार आहे, असे सांगितले जात होते. मात्र, सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाची गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी असा कोणताही विचार नसल्याचे म्हटले. पारस हे म्हणाले,
“स्वतः हार्दिकला विश्वचषकात सर्व सामाने खेळायचे आहेत. कोणाला विश्रांती द्यायची याबाबत अद्याप काहीही विचार केला गेला नाही. हार्दिक आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो अष्टपैलू असल्याने संघात समतोल आणतो. पाकिस्तानविरुद्ध त्याने संघासाठी योगदान दिले होते.”
ते पुढे म्हणाले,
“हार्दिक नक्कीच आम्हाला पाचव्या गोलंदाजांचा पर्याय देतो. मात्र, त्याचा वापर कशाप्रकारे करायचा आहे संपूर्णता परिस्थितीवर अवलंबून असते. सध्या तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याने बळी देखील घेतोय. मात्र, संघात अधिकचा फलंदाज सामील करायचा की नाही हे त्या वेळच्या परिस्थितीवर ठरते.”
भारतीय संघ हा सामना जिंकून गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहचू शकतो. तसेच, नेदरलँड्सने हा सामना गमावल्यास स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ होऊ शकतात.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, रिषभ पंत, अक्षर पटेल, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इतिहास कायम राहिला! विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध इंग्लंड नेहमीच होते टाय-टाय फिस्स
टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानाकडे विराटची आगेकूच, सूर्या-बाबरला मागे टाकत नवा खेळाडू दुसऱ्या क्रमांकावर