---Advertisement---

गुजरात नव्हे लखनऊसाठी खेळणार होता हार्दिक! ‘त्या’ व्यक्तीने वळवले मन, स्वतः केला खुलासा

On: शनिवार, एप्रिल 15, 2023 4:37 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

आयपीएलमध्ये केवळ दुसराच हंगाम खेळत असलेल्या गुजरात टायटन्स संघाने यशाची मालिका सुरू ठेवली आहे. मागील हंगामात आयपीएल पदार्पण करणाऱ्या या संघाने चमकदार कामगिरी करत विजेतेपद आपल्या नावे केले होते. त्यानंतर आयपीएल 2023 मध्ये देखील संघाने विजयी लय कायम राखलेली दिसते. संघाच्या या यशाचा सूत्रधार कर्णधार हार्दिक पंड्या आहे. मात्र, आता स्वतः हार्दिकने आपण गुजरात नव्हेतर लखनऊसाठी खेळण्यात तयार झालो होतो, असा खुलासा केला आहे.

आयपीएल इतिहासातील सर्वात महागडी फ्रेंचायजी असलेल्या गुजरातने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्या हंगामात विजेतेपद पटकावले. कर्णधार म्हणून नियुक्त केलेल्या हार्दिक पंड्या याने अष्टपैलू खेळाडू व कर्णधार अशा दोन्ही भूमिकांमध्ये संघासाठी सर्वोत्तम योगदान दिले. मात्र स्वतः हार्दिकनेच खुलासा केला आहे की, आपल्याला सुरुवातीला लखनऊ संघासाठी खेळण्याचा प्रस्ताव दिला गेलेला.

हार्दिक म्हणाला,

“मला सुरुवातीलाच लखनऊ संघाने खेळण्याविषयी विचारले होते. मी त्यासाठी तयारही झालेलो. कारण, केएल राहुल या संघाचे नेतृत्व करणार होता हे मला माहीत होते. तो माझा चांगला मित्र असल्याने मी त्याच्या नेतृत्वात खेळण्यास उत्सुक होतो. मात्र, त्याचवेळी माझे आशिष नेहराशी बोलणे झाले. त्याने मला गुजरात संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणेविषयी विचारणा झाल्याचे म्हटले. ते फक्त इतकेच म्हणाले, जर मी संघाचा प्रशिक्षक असेल तर तू गुजरातसाठी खेळ‌. पुढे गोष्टी जुळून आल्या आणि मी गुजरातसाठी खेळलो.”

‌आशिष नेहरा यांनी देखील संघाला प्रशिक्षक म्हणून पहिल्याच वेळी विजेते बनवण्याचा मान मिळवला. यापूर्वी त्यांनी आरसीबीसाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

(Hardik Pandya Reveal Am Agree To Play For Lucknow But Ashish Nehra Change My Mind)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

‘मी भारतीय चाहत्यांची तोंडं बंद केली…’, शतक ठोकल्यानंतर हे काय बोलला हॅरी ब्रुक
अखेर बुमराह-श्रेयसच्या दुखापतीवर बीसीसीआयने दिले अपडेट, अशी आहे पुढील रणनीती 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---