रविवार, 24 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 2 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. तसेच या मालिकेनंतर दोन्ही संघात 5 सामन्यांची वनडे मालिका होईल. पण या मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
या दोन्ही मालिकांना भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला मुकावे लागणार आहे. याबद्दल माहिती देताना बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की पंड्याला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत आहे.
त्यामुळे मेडीकल टीमने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यापासून पंड्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या पाठीच्या दुखापतीवर काम करेल.
पंड्याच्या ऐवजी भारताच्या वनडे संघात फिरकीपटू रविंद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे. मात्र टी20 साठी पंड्या ऐवजी कोणालाही संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे टी20 मालिकेसाठी 14 जणांचाच भारतीय संघ असेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिला टी20 सामना 24 फेब्रुवारीला विशाखापट्टणमला तर दुसरा सामना 27 फेब्रुवारीला बंगळूरु येथे होणार आहे. यानंतर 2 मार्चपासून 5 सामन्यांची वनडे मालिका पार पडेल.
मे मध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकाआधी भारतीय संघाच्या या शेवटच्या आंतरराष्ट्रीय मालिका आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–चेतेश्वर पुजाराचे व्हर्जन २.०, टी२० सामन्यात केली नाद खेळी!
–राॅस द बाॅस- राॅस टेलरचा वनडे क्रिकेटमध्ये अजब कारनामा