भारताने घरच्या मैदानावर 2023 वर्षाची विजयी सुरूवात केली आहे. भारताने श्रीलंकेविरुद्धची (INDvSL)तीन सामन्यांची टी20 मालिका 2-1 अशी जिंकली. यामध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू आहेत. त्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2022च्या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना संघाला पदार्पणातच विजेतेपद जिंकून दिले होते. तेव्हापासून त्याने मागे वळून न पाहता भारताचे यशस्वीपणे नेतृत्व केले. याचे श्रेय त्याने भारताच्या दिग्गजाला दिले आहे.
दुखापतीमुळे मोठा काळ भारतीय संघाबाहेर असलेला हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने आयपीएल 2022मध्ये जबरदस्त पुनरागमन केले. त्याने आयपीएल संघ आणि भारताच्या नेतृत्वात यशस्वी होण्यामागचे श्रेय आशीष नेहरा (Ashish Nehra) याला दिले आहे.
हार्दिकने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारताच्या वरिष्ठ संघाचे नेतृत्व केले होते. श्रीलंकेविरुद्धचा तिसरा टी20 सामना जिंकल्यावर हार्दिक म्हणाला, “गुजरातच्या दृष्टीकोनातून जे महत्वाचे वाटले जसे तेथिल प्रशिक्षकांसोबत काम केले तसेच येथे केले. यामध्ये आशिष नेहराने मला खूप मदत केली. आमच्या दोघांचे व्यक्तिमत्व वेगवेगळे आहेत, मात्र क्रिकेटबाबतचे विचार सारखेच आहेत.”
“नेहरांसोबत काम केल्याने मला नेतृत्व करण्यात मदत झाली. त्यांनी माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणला. माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळे कर्णधारपदात खूप मोलाची भर पडली. त्यांनी समर्थन दिल्याने हे सर्व साध्य झाले,” असेही हार्दिकने पुढे म्हटले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात हार्दिकने शेवटचे षटक महाग ठरलेल्या अक्षर पटेल याला दिले होते. अक्षरनेही कर्णधाराचा विश्वास कायम राखत त्या षटकात 10 धावा दिल्या होत्या. तो सामना भारताने 2 धावांनी जिंकला होता. यामुळे पुन्हा एकदा हार्दिकच्या निर्णयाची वाहवा केली गेली. त्याने भारताचे नेतृत्व सर्वप्रथम आयर्लंड दौऱ्यात केले होते. तेथेही भारत जिंकला होता. त्याचबरोबर त्याच्या नेतृत्वात भारत वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड दौऱ्यातही टी20 सामने जिंकला आहे.
आता भारत श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना 10 जानेवारीला गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
40 वर्षापासून श्रीलंका भारतात फेल! सूर्य खेळीने विजय साकार, भारताच्या यशाचे काही बलाढ्य रेकॉर्ड्स
आयपीएल न खेळता पंत मालामाल! बीसीसीआय मोजणार 21 कोटींची रक्कम