वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील टी-२० मालिका रविवारी (७ ऑगस्ट) संपली. भारताने शेवटचा सामना ८८ धावांनी जिंकला असून मालिकेत १-४ अशा अंतराने विजय मिळवला. नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) शेवटच्या टी-२० सामन्यात अनुपस्थित असल्यामुळे हार्दिक पंड्या याने संघाचे नेतृत्व केले. हार्दिकने आयपीएल २०२२ पासून त्याच्यातील नेतृत्वाचे गुण दाखवले आहेत आणि याच कारणास्तव त्याला भविष्यातील भारतीय कर्णधार देखील म्हटले जात आहे. संघाचा नियमित कर्णधार बनण्याविषयी हार्दिकने एक खास प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला अलिकडच्या काळात अनेकदा विश्रांती दिली गेली. तसेच काही वेळा कोरोनाची लागण झाल्यामुळे, तर काही वेळा दुखापतीमुळे रोहित खेळू शकला नाही. रोहितच्या अनुपस्थित संघ व्यवस्थापनाने तब्बल ७ खेळाडूंना कर्णधाराच्या रूपात आजमावले आहे. कर्णधाराच्या रूपात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सर्वांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे.
हार्दिकने आतापर्यंत भारतासाठी तीन सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका पार पाडली आहे आणि तिन्ही सामने जिंकले आहेत. अशात भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनण्याविषयी प्रश्न विचारला असता, हार्दिकने खास प्रतिक्रिया दिली. संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनण्याची संधी मिळाली या गोष्टीचा आनंद होईल, असे तो म्हणाला.
पाचवा टी-२० सामना संपल्यानंतर हार्दिक म्हणाला की, “होय, का नाही? जर मला भविष्यात संधी मिळाली, तर हे करायला आवडेल. परंतु सध्या आमच्यासमोर विश्वचषक आहे आणि आशिया चषक देखील येत आहे. आम्हाला त्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.”
तत्पूर्वी मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या हार्दिकने आयपीएल २०२२ मधून जोरदार पुनरागमन केले. मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर हार्दिक गुजरात टायटन्सचा कर्णधार बनला आणि संघाला विजेतेपद पटकावून दिले. मोठ्या काळापासून गोलंदाजू करू न शकलेल्या हार्दिकने आयपीएलपासून गोलंदाजीला देखील पुन्हा सुरुवात केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी साधली सुवर्ण हॅट्ट्रीक! सात्विक-चिराग जोडीने जिंकले गोल्ड
CWG 2022: अचंता शरथची टेबल टेनिसमध्ये भन्नाट कामगिरी! भारताला जिंकून दिले २२वे सुवर्ण
शॉकिंग! शोएब अख्तरची मोठी सर्जरी; हॉस्पिटलच्या बेडवरूनच म्हणतोय, ‘मला फक्त तुमच्या प्रार्थनेची गरज’