भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर मर्यादीत षटकांच्या भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा अशा अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये हा भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. तर या दुसऱ्या संघाचे शिखर धवनच्या नेतृत्व सांभाळणार आहे. या संघाने दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. याची माहिती भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
हार्दिकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्याने व्यायाम केल्यानंतरची सेल्फी पोस्ट केली आहे. या सेल्फीमध्ये हार्दिक आपली बॉडी दाखवत आहे. या फोटोच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिले की, “वर्क मोड ऑन”. हार्दिक यापूर्वी शेवटचे आयपीएल 2021 मधील सामना खेळताना दिसला आहे.
आता तो मर्यादीत षटकांच्या भारतीय संघासह श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघाला श्रीलंका विरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारतीय संघ 13 जुलैपासून एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर 24 जूनला रवाना होणार आहे.
या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय खेळाडू मुंबईमध्ये २ आठवड्यांसाठी क्वारंटाईन झाले होते. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेसाठी रवाना होईल.
श्रीलंका दौऱ्यावर जाणारा भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
महत्त्वाच्या बातम्या –
साऊदीसमोर रोहित नेहमीच टेकतो गुडघे! कारकीर्दीत तब्बल ‘इतक्या’ वेळा केले आहे बाद
चतुर पंत! भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या टीम साऊदीला असं ओढलं फिरकीच्या जाळ्यात
विराटच्या नेतृत्वात आर अश्विनने केली उल्लेखनीय कामगिरी, ‘या’ यादीत पोहोचला दुसऱ्या स्थानी