सध्या गुजरात टायटन्स आणि त्याचा अष्टपैलू कर्णधार हार्दिक पंड्या चांगलाच चर्चेत आहे. मागच्या वर्षी पंड्याने आपल्या गुजरात टायटन्स संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली. यावर्षीही त्याच्या नेतृत्वात गुजरात संघ चांगले प्रदर्शन करत आहे. पण अशातच भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पंड्याविषयी मोठे भाष्य केले आहे. शांस्त्रीच्या मते हार्दिक पंड्याकडे येत्या काळात भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले गेले पाहिजे.
यावर्षी भारतात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये जून-जुलै महिन्यात आयसीसी टी-20 विश्वचषक(ICC Men’s T20 World Cup) रंगणार आहे. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकमध्ये टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये (Team India Latest Update) इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, यावर्षी होणाऱ्या वनडे आणि पुढच्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदासाठी प्रयत्नशील असेल. हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ आयपीएलच्या चालू हंगामात दर्जेदार कामगिरी करत आहे. गुणतालिकेत गुजरात अव्वल स्थानी आहे. हार्दिकचे वैयक्तिक आणि संघाचा कर्णधार म्हणून प्रदर्शन पाहून रवी शास्त्री (Ravi Shastri) चांगलेच प्रभावित झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शांस्त्रींनी हार्दिककडे तातडीने भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
माझ्या मते हार्दिक उत्तम नेतृत्व करेल
एका वृत्तमाध्यमाशी बोलताना शास्त्री म्हणाले की, “प्रत्येकजण खेळण्यासाठी पात्र होऊ शकतो. पण मला असे वाटते की पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व उत्तम प्रकारे करू शकेल. कारण तो आधीपासूनच टी 20 मध्ये प्रभारी कर्णधार आहे. त्याला फिटनेसची समस्याही नाहीये. अशात संघाचा नियमित कर्णधार बनण्यास तो पात्र आहे.” यावेळी शास्त्री पुढे म्हणाले की, “सध्या युवा खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या (Hardik Pandya) खूप प्रतिभावान आहे. शेवटच्या टी-20 सामन्यात खेळलेले बरेच खेळाडू अजूनही संघात आहेत. परंतु, निश्चितच संघात काही नवीन चेहरेही असू शकतील. कारण या वर्षीच्या आयपीएलमध्ये काही नवीन युवा खेळाडू दिसून आले आहेत.”
टी 20 च्या नवीन कर्णधाराची ओळख करण्यात काहीही नुकसान नाही
शास्त्री पुढे म्हणाले की, “हार्दिक पंड्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो, असेही नाहीये. संघ कसोटी मालिका खेळेतो त्यावेळी त्याला विश्रांती आणि फिट होण्यासाठी एक महिन्याचा वेळ मिळतो. जेव्हा तंदुरुस्त असतो तेव्हा जगातील सर्वोत्तम टी 20 खेळाडूंपैकी एक असतो असं म्हटलं तरी वेगळ ठरणार नाही.” दरम्यान ही पहिली वेल नाहीये, जेव्हा शास्त्रींनी हार्दिकला भारताचा टी-20 कर्णधार म्हणून निवडले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही शास्त्री म्हणाले होते की, “टी-20 साठी नवा कर्णधार ओळखण्यात कोणताही धोका नाही आणि त्याचे नाव हार्दिक पांड्या असू शकते. रोहित शर्मा (Rohit Sharma) हा सर्व फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार (Team India New Captain Of T20 WC) आहे. पण टी 20 विश्वचषका 2022नंतर तो एकही टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.” (Hardik Pandya should become the regular captain of India’s T20 team, said Ravi Shastri)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘मी स्वतःहून कधीच…’, विराटसोबतच्या वादानंतर नवीन उल हकची पहिलीच मुलाखत
जोस बटलरवर बीसीसीआयची मोठी कारवाई! ‘त्या’ कृत्यासाठी बसला ‘एवढा’ मोठा दंड