---Advertisement---

‘भारतासाठी चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी हा खेळाडू योग्य’, झहीर खानने सांगितले कारण

On: रविवार, जून 19, 2022 8:29 PM
India-No.4
---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात शेवटचा आणि मालिका निर्णायक सामना रविवारी (१९ जून) बंगळुरू येथे एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाच सामन्यांची ही टी२० मालिका २-२ अशी बरोबरीत आहे. दक्षिण आफ्रिका हा शेवटचा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. भारताला मागच्या सामन्यात विजय मिळवुन देण्यासाठी कठीण प्रसंगी फलंदाजीला येऊन हार्दिक पंड्याने मोलाची भुमिका बजावली.त्याने सामन्यात ३१ चेंडूत ४६ धावांची आकर्षक अशी खेळी केली. या खेळीमुळे प्रभावीत झालेल्या झहीर खानने हार्दिकच्या फलंदाजीसाठीचा योग्य क्रमांक सांगितला.

भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानने हार्दिक पंड्यासाठी नंबर ४ हा फलंदाजीसाठी योग्य क्रमांक असल्याचे म्हणले आहे. हार्दिक २०१५ ते २०२१ पर्यंत मुंबई इंडियन्सचा अविभाज्य भाग होता तर २०१८ पासुन झहीर मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक आहे. त्यामुळे हार्दिकला झहीर खानने खुप जवळून पाहिले आहे. म्हणुन त्याच्यासाठी नंबर ४ हा त्याला आवडेल असा फलंदाजी क्रमांक आहे, असे मला वाटते.

झहीरने एका संकेतस्थळाशी बोलताना म्हणले की,’ हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकावर खेळायला आवडेल. त्याला माहिती आहे की संघाला सध्या गरज काय आहे आणि त्याचबरोबर त्याला परिस्थितीशी जुळवुन घेणे देखील जमते.आयपीएल वरुन दिसते की त्याला आव्हानाला तोंड द्यायला आवडते. त्याला कसली घाई नाहीये. हीच शैली त्याच्या फलंदाजीची खरे सौंदर्य आहे आणि तेच मला आवडत आहे. एक फलंदाज म्हणुन त्याचे फलंदाजीत नियंत्रण दिसत आहे आणि तो पाहिजे तेव्हा मोठे फटके खेळु शकतो हे आपल्याला माहितीच आहे ज्यामुळे त्याच्यावर एक फलंदाज म्हणुन त्याच्यावर विश्वास वाढतो.’

दरम्यान, हार्दिकला आयर्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेत कर्णधारपद देण्यात आले आहे. अशात हे पाहणे नक्कीच महत्वाचे असेल की, तो स्वत: कोणत्या क्रमांकावर खेळेल. या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत अनेक युवा खेळाडुंना संधी देण्यात येणार आहे. संघाचे वरिष्ठ खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर २०२१ च्या मालिकेतील एकमेव कसोटी सामना खेळेतील.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘त्याला वजनामुळे खाली वाकता सुद्धा येत नाही’, माजी पाकिस्तानी दिग्गजाने पंतला फटकारले

‘गुजरात टायटन्सचा ‘हा’ खेळाडू विश्वचषकात खेळण्यासाठी योग्य नाही,’ आशीष नेहराने केली भविष्यवाणी

रोहित-बाबर एकत्र सलामीवीर म्हणून खेळणार, वाचा काय आहे संघाचे नाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---