भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या त्याच्या खास अंदाजासाठी ओळखला जातो. या अंदाजामुळे तो मैदानात आणि मैदानाबाहेरही चर्चेचा विषय ठरतो. मैदानातील स्वभावासाठी, तर मैदानाबाहेर लव्हस्टोरीमुळे चांगलीच वाहवा मिळवताना दिसतो. हार्दिकने व्हॅलेंटाईन डे 2023 रोजी पत्नी नताशा स्टॅन्कोविक हिच्यासोबतच्या आठवणी ताज्या केल्या. त्याने हा दिवस लग्नाच्या रूपात साजरा केला होता. अशातच हार्दिकने त्याच्या लग्न समारंभात श्रीमंतीचा थाट दाखवला. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत कृणाल पंड्या (Krunal Pandya) याची पत्नी पंखुरी शर्मा (Pankhuri Sharma) हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याचे बूट चोरल्यानंतर मोठ्या रकमेची मागणी करते. यावेळी हार्दिक तिला विचारतो की, किती पैसे पाहिजेत? या प्रश्नाचे उत्तर देताना पंखुरी हार्दिककडे 1 लाख रुपयांची मागणी करते. यानंतर हार्दिक पैसे ट्रान्सफर करण्यााठी कार्तिकला आवाज देतो.
आधी तर हार्दिक दोन लाख बोलतो, पण त्यानंतर लगेच म्हणतो की, “मी तुला पाच लाख रुपये देतो.” अशाप्रकारे पंड्या मागणीच्या तब्बल 5 पट जास्त रुपये देतो. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडिया युजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
https://www.instagram.com/reel/CtixLvHAZAX/?utm_source=ig_embed&ig_rid=1a17203c-d6bf-43bc-84a6-6eeef30fc7e4
Ameeri ho to aisi ho. Hardik Pandya jitna ameer hona hai life me pic.twitter.com/qyHvfkxFWq
— CS Rishabh (Professor) (@ProfesorSahab) June 18, 2023
आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात पराभव
मे महिन्याच्या अखेरीस आयपीएल 2023 हंगामाच्या अंतिम सामन्यात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघ पोहोचला होता. ही अंतिम सामन्यात पोहोचण्याची सलग दुसरी वेळ होती. या सामन्यात गुजरातपुढे एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाचे आव्हान होते. हा सामना चेन्नईने जिंकला होता. विशेष म्हणजे, यापूर्वी आयपीएल 2022 हंगामात गुजरातने विजेतेपद जिंकले होते. यापूर्वी हार्दिक रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. (cricketer hardik pandya steals shoe at his wedding and gives how many lakh rupees to sister in law see video)
महत्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वे-वेस्ट इंडिजची वर्ल्डकप क्वालिफायर्समध्ये विजयी सुरुवात, होल्डर-एर्विन चमकले
Ashes 2023। पावसामुळे खेळ अपूर्ण; तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड आघाडीवर, ऑस्ट्रेलियाचीही चांगली सुरुवात