टी20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत टीम इंडियाची धुरा रोहित शर्माकडे होती. तर उपकर्णधारपद हार्दिक पांड्याकडे होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी20 विश्वचषकाची ट्राॅफी उंचावले. त्यानंतर हिटमॅनने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतले. अश्या परिस्थितीत बीसीसीआयने आणखी टी20 क्रिकेटसाठी भारतीय संघाचा कर्णधार घोषित केले नाही. तथापी भारतीय संघ टी20 विश्वचषकानंतर 5 सामन्यांसाठी झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी गेले होते. ज्यामध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद शुबमन गिलकडे होते. पण या दाैऱ्यासाठी भारतीय संघात युवा खेळाडूंची निवड झाली होती.
आगामी 26 जुलैपासून भारतीय संघ श्रीलंका दाैऱ्यावर जाणार आहे. ज्यामध्ये संघ 3 टी20 तर 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. वृत्त अहवालानुसार या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची धुरा हार्दिक पांड्याकडे देणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. याच दरम्यान मोठी अपडेट समाेर आले आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आणि निवड समिती मधील सदस्य या निर्णयासाठी एकजूट नसल्याचे समोर येत आहे. हार्दिक पांड्याला नवा टी20 कर्णधार बनवण्यासाठी अनेकांचे वेग-वेगळे मत येत आहेत. त्याचं प्रमुख कारण म्हणजे त्याची फिटनेस ज्यामुळे हार्दिकला क्रिकेटमधून खूपवेळा बाहेर रहावे लागले आहे. खर तर हार्दिक पांड्याने भारतीय संघाच्या टी20 विश्वचषकाच्या विजायमध्ये मोलाचे योगदान दिले होते.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला प्रतिक्रिया देताना म्हणाले, “हा खूप नाजूक विषय आहे. हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आणखी एकमत झालेला नाही. हार्दिक पांड्याचा फिटनेसचा देखील मुद्दा आहे. तर याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवचाही कर्णधार म्हणून बीसीसीआय विचार करत आहे.”
वृत्त अहवालानुसर, हार्दिक पांड्याला टी20 कर्णधारपदासाठी हेड कोच गाैतम गंभीर महत्तवाची भूमिका बजावू शकतो. तर याबाबतीत गाैतम गंभीरचे निर्णय अंतिम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अश्या परिस्थितीत कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या नेतृत्वावेळी गाैतम गंभीरच्या सूर्यकुमार यादव एकत्र खेळले आहेत. ज्यामुळे सूर्यकुमार यादवसाठी गंभीरची झुकती बाजू असल्याचे बोल्ले जात आहे.
महत्तवाच्या बातम्या-
‘फक्त स्टार खेळाडूंनाच मान, इतरांकडे…’; माजी खेळाडूने सांगितलं आरसीबीचं डार्क सीक्रेट
एकेकाळी होते टीम इंडियाचे मॅचविनर खेळाडू…आता संधीसाठी झगडत आहेत! निवृत्ती हाच शेवटचा पर्याय
पाकिस्तानातही बुमराहच्या नावाचा डंका! चिमुकल्याने केली बॉलिंग ऍक्शनची नक्कल, Video व्हायरल