श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. या मालिकेसह सूर्या कर्णधार म्हणून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करेल. त्याचबरोबर भारतीय संघ गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली पहिली मालिका खेळणार आहे. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या जरी टी20 कर्णधार बनू शकला नाही, तरी तो या मालिकेत मोठा चमत्कार घडवू शकतो. हार्दिक पांड्या इतिहास रचण्याच्या जवळ आहे.
हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत 8 धावा करण्यात यशस्वी झाला, तर तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 1500 धावा पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा पांड्या भारताचा 8वा खेळाडू बनणार आहे. हार्दिकच्या आधी असा पराक्रम रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांनी केला आहे.
हार्दिक पांड्यानं आतापर्यंत 100 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 77 डावांमध्ये 26.64 च्या सरासरीनं 1492 धावा केल्या आहेत. याशिवाय पांड्यानं टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 84 विकेट्सही घेतल्या आहेत. पांड्या जर 1500 धावा पूर्ण करण्यात यशस्वी झाला तर त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला जाईल. हार्दिक पांड्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1500 धावा आणि 50 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा एकमेव भारतीय खेळाडू बनेल!
भारताचा श्रीलंका दौरा संपूर्ण वेळापत्रक
टी20 मालिका
27 जुलै – पहिला टी20, संध्याकाळी 7:00
28 जुलै- दुसरा टी20 – संध्याकाळी 7:00
30 जुलै – तिसरा टी20- संध्याकाळी 7:00
एकदिवसीय मालिका
2 ऑगस्ट- पहिला एकदिवसीय, दुपारी 2:30
4 ऑगस्ट – दुसरा एकदिवसीय, दुपारी 2:30
7 ऑगस्ट – तिसरा एकदिवसीय, दुपारी 2:30
भारतीय संघ पुढीलप्रमाणे –
टी20 संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज
एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
हेही वाचा –
यशस्वी जयस्वाल मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; अशी कामगिरी केल्यास ठरणार ‘जगातील पहिलाच फलंदाज’
केएल राहुलचा राऊडी अंदाज! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी उडवलं ‘फायटर प्लेन’; VIDEO व्हायरल
3 खेळाडू जे भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतून बाहेर झाले, एक जण तर रुग्णालयात दाखल!