---Advertisement---

हार्दिकने ३ वर्षांनंतर भावाच्या अपमानाचा बदला घेतला? कार्तिकने दिलेली कृणालला अपमानास्पद वागणूक

On: शुक्रवार, जून 10, 2022 2:48 PM
Dinesh-Karthik-Hardik-Pandya-Krunal-Pandya
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या ५ टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेठली स्टेडियम येथे खेळवण्यात आला. या सामन्यांत भारताने प्रथम फलंदाजी करत असताना २११ धावा केल्या. यावेळी भारतासाठी इशान किशनने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाडने सलामीवीर म्हणून चांगली भुमिका बजावली. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतने डावाला गती देण्याचे काम केलेे. आणि शएवटी हार्दिकच्या तुफानी खेळीने भारताला २००च्या पार नेले. मात्र, डावाच्या शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर दिनेश कार्तिकला धाव घेण्यास नकार दिला. हार्दिकने नकार दिल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.

ही बाब खूपच लहान वाटत असली तरी क्रिकेट चाहत्यांनी याला ३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेशी जोडले आहे. २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अशाच एका प्रसंगी, दिनेश कार्तिकने क्रुणाल पांड्यासोबत फलंदाजी करताना एक धाव घेण्यास नकार दिला होता. आता हार्दिक पांड्यावर आरोप केला जात आहे की, त्याने आपल्या भावासोबत घडलेल्या घटनेचा बदला दिनेश कार्तिककडून घेतला आहे.

वास्तविक, एनरिक नॉर्टजेने २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रिषभ पंतला रसी व्हॅन डेर डुसेनकरवी झेलबाद केले. तो १६ चेंडूत २९ धावा करून बाद झाला. यानंतर मैदानात आलेल्या दिनेश कार्तिकचे प्रेक्षकांनी डीके, डीके, डीके.. असा जयघोष करत स्वागत केले. ज्या विध्वंसक शैलीत कार्तिकने आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीसाठी अनेक सामने जिंकले त्यामुळे भारतीय संघाच्या चाहत्यांच्या आशा वाढल्या आहेत. पहिल्या चेंडूवर दिनेश कार्तिकला एकही धाव घेता आली नाही, तर दुसरा चेंडू यॉर्कर होता आणि त्यावर त्याने धाव घेतली. हार्दिक पंड्याने ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला, तर पाचव्या चेंडूवर शॉट खेळला. येथे दिनेश कार्तिक धाव घेण्यासाठी धावला, पण हार्दिक पांड्याने नकार दिला. हे विचित्र होते, कारण हार्दिककडे धावा काढण्यासाठी भरपूर वेळ होता. दुसऱ्या टोकाला कार्तिकला मोठा फटका मारता आला. त्यामुळे धाव नाकारण्याचे कोणतेही वैध कारण नव्हते, पण पंड्याने ते केले. शेवटच्या चेंडूवर त्याला २ धावा करता आल्या.

दरम्यान, २०१९ साली न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर टिम साऊदीच्या चेंडूवर एक शॉट खेळला, पण त्याने धाव घेण्यास नकार दिला. इथे दुसऱ्या टोकाला होता कृणाल पांड्या. फॅनने हा सामना दिल्लीत खेळल्या गेलेल्या सामन्याशी जोडला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

भारत पहिली टी२० का हरला? आयपीएल आहे त्याचं कारण, स्वतः आफ्रिकेच्या खेळाडूनेच सांगितलंय

एकमेकींची केसं ओढली, दुसऱ्या सामन्याचं तिकिट मिळवण्यासाठी महिलांची तुंबळ हाणामारी, Video तुफान Viral

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर कुलदीप भावुक, चहलने केले सांत्वन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---