माऊंट मॉनगनुई| न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज तिसरा वऩडे सामना बे ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यातून अष्टपैलू खेळा़डू हार्दिक पंड्याने भारतीय संघात बंदीनंतर पुनरागमन केले आहे. या पुनरागमनाच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनचा जबरदस्त झेल घेत त्याने सर्वांचे लक्ष वेधले.
झाले असे की युजवेंद्र चलहने टाकलेल्या 17 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विलियमसनने शॉर्ट मिड विकेटच्या दिशेला फ्लिकचा फटका मारला. पण त्याठिकाणी क्षेत्रकक्षण करत असलेल्या हार्दिकने त्याच्या डाव्याबाजूला सूर मारत अफलातून झेल घेतला. त्यामुळे विलियमसन 28 धावा करुन बाद झाला.
#teamindia #HardikPandya
Awesome catch … pic.twitter.com/41Ap3cQLJP— SHANKAR (@Mr_M_SHANKAR_) January 28, 2019
त्याआधी विलियमसन आणि रॉस टेलरने तिसऱ्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली होती. न्यूझीलंडने पहिल्या दोन सामन्याप्रमाणे या सामन्यातही कॉलीन मुन्रो आणि मार्टिन गप्टील या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स लवकर गमावल्या.
पण विलियमसन बाद झाल्यानंतर टेलरने टॉम लॅथमच्या मदतीने भक्कम शतकी भागीदारी रचली. या दोघांनी 119 धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारी केली. ही जोडी तोडण्यात चहलला यश आले. त्याने लॅथमला 51 धावांवर असताना बाद केले.
या सामन्यासाठी भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या ऐवजी दिनेश कार्तिकला संधी मिळाली आहे. धोनीला हॅमस्ट्रींगची दुखापत असल्याने तो या सामन्यातून बाहेर गेला आहे. विजय शंकर ऐवजी हार्दिकला संघात घेण्यात आले आहे.
तसेच हार्दिकवर मागील काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करन या शोमध्ये केलेल्या विवादात्मक विधानांमुळे बंदी घालण्यात आली होती. परंतू मागील आठवड्यात त्याच्यावरील ही बंदी उठवण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या-
–राफाची बारी? नाही नाही, जोकरच भारी!!
–नोव्हाक जोकोविचने सातव्यांदा जिंकले ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद
–सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद