भारत विरुद्ध पाकिस्तानच्या बहुचर्चित सामन्यात भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. बाबर आझम आणि फकर जमान यांच्या विकेटनंतर पाकिस्तानी संघाला भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याने तिसरा झटका दिला आहे. इफ्तिकार अहमदच्या रुपाने हार्दिक पंड्याने भारताला तिरसी विकेट मिळवून दिली आहे. पंड्याने टाकलेल्या खतरनाक बाउंसरवर इफ्तिकार अहमद कार्तिकच्या हाते झेलबाद झाला.
https://twitter.com/BCCI/status/1563906668592877569
सामन्यातील तेराव्य षटकातील पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याने एक खतरनाक बाऊंसर टाकला. त्या बॉलवर फटका मारण्याच्या नादात इफ्तिकारने आपला तोल गमावला. आणि बॅटचा किनारा घेतलेला बॉल थेट कार्तिककडे गेला. कार्तिकनेहवेत उडी घेत एक उत्कृष्ट झेल घेत इफ्तिकारला बाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला दुसरा झटका! बाबरनंतर आलेल्या फकरला आवेशने चालता-बोलता धाडलं परत
ना सचिन ना धोनी; मैदानावर उतरताच विराट बनला ‘नंबर वन’
भारताच्या स्विंग किंगकडून पाक संघाचा किंग गपगार; असा फसवला की डोकं हलवतंच तंबूत परतला






टी20 वर्ल्डकप 2026: एमएस धोनी करणार का कमेंट्री? माजी कर्णधारने दिला थेट उत्तर