भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या अफलातून फॉर्ममध्ये आहे. टी20 विश्वचषकात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयात त्याने निर्णायक भूमिका बजावली. या सामन्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. त्याचवेळी क्रिकेटमधील धावबादच्या नवीन नियमाबाबत (मंकडिंग) त्याने आपले मत ही व्यक्त केले आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर हार्दिकने आयसीसीच्या चॅनेलशी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला मंकडिंगबाबत विचारले गेले. यावर उत्तर देताना तो म्हणाला,
“मला वाटते आता याबाबतची चर्चा बंद व्हायला हवी. कारण हे आता अधिकृत झालेले आहे. उद्या मला कोणी अशाप्रकारे बाद केले तर मी स्वतः मैदान सोडेल. मला याचा राग येणार नाही. कारण, ही माझी चुकी असेल. मंकडिंगला धावबादचा दर्जा दिला गेला असला तरी, अजूनही असे प्रकरण होते तेव्हा खेळभावनेचीच चर्चा होते.”
मंकडिंग म्हणजेच गोलंदाज गोलंदाजी करत असताना चेंडू टाकण्यापूर्वी फलंदाज नॉन स्ट्राईक एंडच्या पुढे गेला असेल तर त्याला बाद करू शकतो. भारताचे माजी अष्टपैलू विनू मंकड यांनी 1947-1948 मध्ये बिल ब्राऊन यांना कशा पद्धतीने बाद केल्यानंतर या प्रकारे बाद होण्याच्या पद्धतीला मंकडिंग म्हटले जाऊ लागले. अशाप्रकारे फलंदाजाला बाद केल्यास अनेकदा हे अखिलाडू वृत्तीचे प्रतीक आहे असे म्हटले जात होते. नुकतेच आयसीसीने या बाद होण्याच्या पद्धतीला धावबाद मध्ये समाविष्ट केले आहे.
नुकतेच भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना लॉर्ड्स येथील अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी एक गडी बाद करण्याची आवश्यकता असताना, दीप्ती शर्मा हिने चार्ली डीनला अशाप्रकारे बाद केलेले. त्यानंतर मोठे वादंग निर्माण झाले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या यशाने शास्त्रींचा आनंद गगनात मावेना; म्हणाले, “त्याने आता सर्वांची…”
पाकिस्तानला धूळ चारून भारतीय संघ सिडनीत दाखल, नेदरलंडसोबत खेळायचा आहे पुढचा सामना