टीम इंडिया 2024 च्या टी20 विश्वचषकासाठी पूर्णपणे सज्ज आहे. उपकर्णधार हार्दिक पांड्या नेट्समध्ये खूप घाम गाळत आहे. तो टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघासाठी हुकुमाचा एक्का साबित होऊ शकतो.
हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 मधील खराब कामगिरीमुळे खूप टीकेला सामोरं जावे लागलं होतं. आयपीएल 2024 मध्ये तो सपशेल फ्लॉप झाला होता. मात्र आता पांड्या पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. नुकताच त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो गोलंदाजी आणि फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत घाम गाळताना दिसतोय. तो नेट्समध्ये फलंदाजीसोबतच गोलंदाजीचाही सराव करतोय. पांड्यानं फलंदाजीचा सराव करताना अनेक प्रकारचे शॉट्स खेळले. त्यानं षटकारांचाही सराव केला. हार्दिक पांड्यानं इंस्टाग्राम आणि ‘X’ वर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो सराव करताना दिसत आहे. पांड्याच्या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्याचा सराव पाहून तो विश्वचषकासाठी फोकस असल्याचा दिसतोय. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, हार्दिक पांड्यानं बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात दमदार कामगिरी केली होती.
View this post on Instagram
आयपीएलच्या या हंगामात हार्दिक पांड्याची कामगिरी खूपच साधारण राहिली. या मोसमात त्यानं एकूण 216 धावा केल्या, ज्यामध्ये 46 धावांच्या सर्वाधिक खेळीचा समावेश होता. गोलंदाजीत त्यानं नक्कीच 11 विकेट्स घेतल्या, मात्र त्याची इकॉनॉमी 10.75 एवढी राहिली.
बुधवारी (5 जून) भारत आणि आयर्लंड यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यासाठी हार्दिक पांड्याचं प्लेईंग इलेव्हनमधील स्थान जवळपास निश्चित आहे. बांगलादेशविरुद्ध त्यानं शानदार फलंदाजी केली होती. तो भरवश्याचा अष्टपैलू खेळाडू असून त्यानं टीम इंडियासाठी अनेक प्रसंगी चांगली कामगिरी केली आहे. गेला आयपीएलचा हंगाम त्याच्यासाठी चांगला नव्हता. मात्र, आता तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. आयर्लंडनंतर भारतीय संघ 9 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील असे 5 सामने ज्यात सर्वाधिक डॉट बॉल खेळले गेले
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! टी20 विश्वचषकाचे सामने घरबसल्या मोफत पाहता येणार
पाकिस्तानच्या हसन अलीचं पुन्हा एकदा हसं! विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करताना झाली दुखापत; पाहा VIDEO