पुणे। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ५७ वा सामना मंगळवारी (१० मे) पार पडला. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे येथे पार पडलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने ६२ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, हा सामना फलंदाजांसाठी कठीण गेल्याचे दिसते. पण, गुजरातने या सामन्यात विजयासह आयपीएल २०२२ मधील प्लेऑफचे टिकीट पक्के केले आहे. पण, असे असले तरी या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याच्यावर एका क्षणी डोकं पकडण्याचीही वेळ आली होती.
झाले असे की, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्सकडून हार्दिक (Hardik Pandya) चौथ्या क्रमांकावर आला होता. पण, त्याला खास काही करता आले नाही आणि तो केवळ ११ धावांवर बाद झाला. त्याने विकेट गमावल्यानंतर तो खूप निराश दिसला.
गुजरातची फलंदाजी सुरू असताना लखनऊचा (Lucknow Super Giants vs Gujarat Titans) कर्णधार केएल राहुलने आवेश खानकडे (Avesh Khan) चेंडू सोपवला. त्यानेही हा विश्वास सार्थ ठरवत या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकला बाद केले. हार्दिकने ऑफ साई़डचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेत यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या हातात गेला. त्यामुळे हार्दिकला १३ चेंडूत ११ धावा करून माघारी परतावे लागले.
हार्दिकचा जेव्हा डी कॉकने झेल घेतला, तेव्हा त्याला विश्वासही बसला नव्हता. तसेच त्याने हेल्मेटवरूनच कपाळाच्या दिशेने हात नेत त्याची निराशा प्रकट केली होती. त्याचबरोबर तो नंतर डगआऊटमध्येही तसाच काहीवेळ हेल्मेट घालून बसलेला दिसला होता. त्यामुळे हे स्पष्ट होत होते की, हार्दिक त्याच्या विकेटमुळे किती निराश आहे.
https://twitter.com/krishnaa_ti/status/1524042843366764546
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, हार्दिक जरी लवकर बाद झाला तरी, गुजरातकडून शुबमन गिलने ४९ चेंडूत नाबाद ६३ धावांची खेळी केली आणि संघाला २० षटकांत ४ बाद १४४ धावांपर्यंत पोहचवले. यात डेव्हिड मिलरने २६ आणि राहुल तेवतियाने नाबाद २२ धावांचे योगदान दिले होते. लखनऊकडून अवेश खानने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर लखनऊ संघ १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १३.५ षटकात ८२ धावांवर सर्वबाद झाला. लखनऊकडून दीपक हुडाने २७ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त अन्य कोणाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. गुजरातकडून राशिदने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! मुंबईतील धावपटू जवळपास महिन्याभरापासून बेपत्ता, ‘हे’ गंभीर कारण असण्याची शक्यता
चेन्नई आणि जडेजा यांच बिनसलं? ‘या’ गोष्टीमुळे चर्चेला उधाण
पुष्पा फिवर कमी होईना! आता तर नेपाळच्या महिला क्रिकेटपटूनेही केले ‘झुकेगा नहीं’ सेलिब्रेशन