आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत करत विजेतेपद पटकावले आहे. ५ वर्षांनंतर आयपीएलला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जला वगळता नवा विजेता मिळाला आहे. अंतिम सामन्यात गुजरातकडून हार्दिक पंड्या याने कर्णधार खेळी केली. गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही त्याने योगदान दिले. त्याच्या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय हार्दिकच्या एका कामाची भरपूर प्रशंसा होत आहे.
गुजरातच्या विजयानंतर (IPL 2022 Winner) बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी विजेता कर्णधार हार्दिककडे ट्रॉफी सोपवली. त्यानंतर हार्दिकने ते काम केले, जे कर्णधार म्हणून एमएस धोनी (MS Dhoni), रोहित शर्मा आणि विराट कोहली करत आले आहेत.
झाले असे की, हार्दिकला (Hardik Pandya) आयपीएल ट्रॉफी हातात मिळताच त्याने ही ट्रॉफी आपल्या संघातील ज्यूनियर खेळाडूंकडे सोपवली. आयपीएलच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर या क्षणाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्याला पाहून चाहते हार्दिकची भरपूर प्रशंसा करत आहेत.
ट्रॉफी जिंकल्यानंतर संघातील युवा खेळाडूंकडे ट्रॉफी सोपवण्याची ही प्रथा धोनीने सुरू केली होती. धोनीच्या पावलावर पाऊल ठेवत रोहित आणि विराटनेही या प्रथेचा अंगीकार केला. अशात आता हार्दिकही आपल्या आदर्श खेळाडूच्या मार्गावर चालत आहे.
𝗖. 𝗛. 𝗔. 𝗠. 𝗣. 𝗜. 𝗢. 𝗡. 𝗦! 🏆 🙌
That moment when the @gujarat_titans captain @hardikpandya7 received the IPL trophy from the hands of Mr. @SGanguly99, President, BCCI and Mr. @JayShah, Honorary Secretary, BCCI. 👏 👏#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/QKmqRcemlY
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
दरम्यान राजस्थानविरुद्धच्या अंतिम सामन्यात हार्दिकने अष्टपैलू खेळ दाखवला. त्याने प्रथम गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेतल्या. ४ षटके फेकताना केवळ १७ धावा देत त्याने राजस्थानच्या ३ फलंदाजांना बाद केले. यासह तो अनिल कुंबळेंनंतर अंतिम सामन्यात विकेट्स घेणारा दुसराच कर्णधार ठरला आहे. याबरोबरच हार्दिकने फलंदाजी करताना ३० चेंडूत ३४ धावांची खेळीही केली. या खेळीदरम्यान त्याने १ षटकार आणि ३ चौकारही मारले.
त्याच्या या अष्टपैलू प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यासह हार्दिक अंतिम सामन्यात सामनावीर बनणारा तिसराच कर्णधार बनला आहे. कुंबळेंनी २००९ तर रोहितने २०१५ मध्ये अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकला होता.
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीचा हिरो ठरलेल्या रजत पाटीदार किती करतो कमाई? जाणून घ्या सविस्तर
PDFA Football League। ४ लायन्स एफए, स्निग्मय ब संघांचा सहज विजय
संपूर्ण यादी: आयपीएल फायनलमध्ये ‘या’ खेळाडूंनी केल्यात सर्वोच्च धावा, दोघांनी शतकंही ठोकलीत