---Advertisement---

IPL 2026: हार्दिक पांड्याची रोहित शर्माला वॉर्निंग? खुद्द मुंबई इंडियन्सने दिले स्पष्टीकरण, नेमके प्रकरण काय

On: शनिवार, मार्च 14, 2026 4:44 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम येत्या २८ मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे खुद्द मुंबई इंडियन्सलाच समोर येत त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

आयपीएलचा यंदा १९वा हंगाम आहे. यासाठी सर्व संघ जोरात तयारीला लागले आहेत. बीसीसीआयने सुरूवातीच्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अशातच पाच वेळेचा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सबाबात धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जात की मुंबईचा कर्णधार हार्दिकने रोहितला वॉर्निंग दिली आहे. त्यावर मुंबईने प्रतीक्रिया दिली असून हे खोटे असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडियावर पसरलेल्या माहितीनुसार, हार्दिकने संघ व्यवस्थापनाला कळवले की रोहित यावेळी धावा करण्यात अपयशी ठरला तर ते सहन केले जाणार नाही. गेल्या १०-१२ वर्षांत रोहितच्या कामगिरीवर व्यवस्थापन नाराज आहे, कारण तो केवळ प्रत्येक हंगामात केवळ २००-३०० धावाच करू शकला आहे. त्यावेळी त्याचा स्ट्राईक रेटही १२०च्या आसपास राहिला. असे असले तरीही तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.

रोहित-हार्दिक या दोघांसाही चाहतावर्ग मोठा असल्याने त्यांच्याबाबतही ही माहिती झपाट्याने पसरत आहे. रोहितचा फलंदाजी फॉर्म मागील काही काळापासून चिंतेचा विषय बनला आहे. २०१३ पासून त्याने आयपीएलच्या हंगामात ५०० धावा केल्या नाहीत. २०२५ च्या हंगामात त्याने १५ सामन्यांत ४१८ धावा केल्या होत्या. सध्या मुंबई इंडियन्सने हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करताना सोशल मीडियावर काहीही एवढेच म्हणत हार्दिकची GIF पोस्ट केली आहे.

हार्दिक २०२४ पासून मुंबईचे कर्णधारपद सांभाळत असून रोहितही यशस्वी कर्णधार राहिला आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. मुंबईचा २०२६च्या हंगामात पहिला सामना २९ मार्चला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---