29 जून रोजी झालेल्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावलं. आतापर्यंत टीम इंडियाचे बहुतेक खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. मात्र उपकर्णधार हार्दिक पांड्या आज त्याच्या मूळ गावी, म्हणजेच वडोदरा येथे पोहचला. यावेळी त्याचं भव्य स्वागत करण्यात आलं. टीम इंडियासाठी ज्याप्रमाणे मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर खुल्या बसमध्ये रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं, अगदी त्याचप्रमाणे हार्दिकसाठी देखील वडोदऱ्यात रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं.
हार्दिक पांड्याचा रोड शो मांडवी येथून सुरू होऊन लहरीपुरा, सूरसागर आणि दांडिया बाजारमार्गे नवलखी कंपाऊंड येथे संपला. यावेळी हार्दिक टीम इंडियाच्या विश्वचषक विजेत्या जर्सीत दिसला. तो ज्या खुल्या बसमध्ये होता, त्यावर ‘हार्दिक पांड्या प्राइड ऑफ वडोदरा’ असं लिहिलं होते. यावेळी हजारो लोक रस्त्यावर जमले होते. अनेक लोक हातात तिरंगा झेंडा फडकावताना दिसत होते. हार्दिकचा रोड शो सोमवारी (15 जुलै) सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास सुरू झाला.
या रोड शोदरम्यान ‘वंदे मातरम’ही वाजवण्यात आलं. बसभोवती पोलीस बंदोबस्त तैनात होता. तसेच सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्यात आली होती. हार्दिकची एक झलक पाहण्यासाठी वडोदरातील हजारो लोक जमले होते. सर्वजण त्यांच्या फोनवर त्याचे फोटो क्लिक करताना दिसले.
हार्दिक पांड्यानं बराच काळ खुल्या बसमध्ये बसून लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. काही वेळानं त्याचा भाऊ कृणाल पांड्याही बसमध्ये दिसला. क्रुणाल ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक पॅन्टच्या गेट-अपमध्ये होता. या रोड शोची सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे, टीम इंडियाच्या रोड शोदरम्यान ज्याप्रमाणे एक चाहता झाडावर चढला होता, त्याचप्रमाणे यावेळी देखील एक व्यक्ती झाडावर चढून हार्दिकचा फोटो काढताना दिसला.
A HERO’S WELCOME FOR HARDIK PANDYA IN VADODARA. 😍🏆 pic.twitter.com/LFY0g1ZgOX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 15, 2024
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचा युवा वेगवान गोलंदाज लग्न बंधनात अडकला! पत्नीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर
‘माफी मागा…’, युवराज-हरभजन-रैनाला भारी पडू शकतो विचित्र डान्स; पॅरालिम्पिक समितीचा आक्षेप
पाकिस्तानची विचित्र मागणी, चॅम्पियन्स ट्रॉफी बाबत भारताकडून लेखी उत्तर मागितलं; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण