टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, त्याचं चर्चेत येण्याचं कारण क्रिकेट नसून वैयक्तिक आयुष्य आहे.
वास्तविक, मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच यांच्यात घटस्फोट होणार आहे. दोघांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या बातम्यांदरम्यान, नताशानं अलीकडेच इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, जी खूप चर्चेत आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांचा घटस्फोट झाला, तर हार्दिक पांड्याला त्याच्या संपत्तीपैकी 70 टक्के संपत्ती नताशाला द्यावी लागेल. मालमत्तेशी संबंधित या सततच्या बातम्यांदरम्यान, नताशानं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. तिनं स्टोरीमध्ये एक छायाचित्र शेअर केलं आहे. यामध्ये रस्त्याचे सर्व नियम आणि चिन्हं दिसत आहेत. नताशानं फोटोसोबत एक खास कॅप्शनही लिहिलं. तिनं लिहिलं की, “कोणीतरी रस्त्यावर येणार आहे.” नताशानं शेअर केलेली ही स्टोरी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या आणि तिच्यामधील संपत्तीच्या विभाजनाशी जोडली जात आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी 2020 मध्ये एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नानंतर दोघांनीही त्याच वर्षी जुलैमध्ये मुलगा अगस्त्यला जन्म दिला. मात्र आता लग्नाच्या अवघ्या 4 वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाल्याची बातमी चर्चेचा विषय बनली आहे. नताशा इंस्टाग्रामवर तिच्या प्रोफाइलमध्ये ‘पांड्या’ आडनाव लिहायची. परंतु आता तिनं हे आडनाव काढून टाकलं आहे. याशिवाय तिनं हार्दिकसोबतचे सर्व लेटेस्ट फोटोही काढून टाकले आहेत. नताशानं हार्दिकचे फक्त तेच फोटो ठेवले आहेत, ज्यामध्ये त्यांच्यासोबत ‘अगस्त्य’ देखील आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या फारच वाईट काळातून जात आहे. प्रथम त्याचा संघ खराब कामगिरीमुळे आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आणि आता त्याच्या पत्नीसोबत विभक्त होण्याच्या बातम्या येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
नताशा स्टॅनकोविच पूर्वी हार्दिक पांड्यानं ‘या’ सेलिब्रिटींना डेट केलं होतं, जाणून घ्या
हार्दिक पांड्याच्या संपत्तीचा 70 टक्के हिस्सा घेणार नताशा? मुंबईच्या कर्णधाराची एकूण संपत्ती किती?
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्या नात्यात दुरावा? इंस्टाग्रामवरून आडनाव हटवल्यामुळे खळबळ!