भारतीय पुरूष संघ बांगलादेश दौऱ्यानंतर घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध (INDvSL) वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहेत. या मालिकेत प्रत्येकी तीन-तीन सामने खेळले जाणार आहेत. श्रीलंकेच्या या दौऱ्याची सुरूवात टी20 मालिकेने होणार असून पहिला सामना 3 जानेवारीला मुंबईमध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेत भारताचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार असल्याचे समोर येत आहे. हा निष्कर्ष त्यानेच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवरून लावला जात आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी भारताचा संघ 27 डिसेंबरला घोषित केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये हार्दिक पंड्या (Hardik Pandya) भारताचे कर्णधारपद सांभाळणार असल्याचे समोर येत आहे. टी20 मालिकेसाठी स्टार स्पोर्ट्सने एक प्रोमो रिलीज केला, जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्या प्रोमोमध्ये हार्दिक स्टेडियमध्ये बसलेला दिसत आहे. या व्हिडिओच्या शेवटी श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका आणि हार्दिकचा फोटो दाखवण्यात आला आहे. यावरून हार्दिक श्रीलंकेविरुद्ध भारताच कर्णधार असण्याची दाट शक्यता आहे.
हार्दिकनेही हा व्हिडिओ त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर शेयर केला आहे. त्याल्या त्याने ‘जंगलही आमचे आणि सत्ताही आमचीच. आशिया कपच्या चॅम्पियनचा सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत.’
#Collab Jungle bhi hamara aur raj bhi hamara! ????#TeamIndia is ready to take on the Asian Champions in the Mastercard #INDvSL series! ????
Don't miss the live action from this ???? rivalry from Jan 3 onwards, only on @StarSportsIndia & Disney+Hotstar pic.twitter.com/Hk8Ya8lPPm
— hardik pandya (@hardikpandya7) December 25, 2022
श्रीलंकेविरुद्ध हार्दिकला नेतृत्व मिळाले तर काही आश्चर्याची बाब नाही. त्याने याआधीही भारताच्या टी20 संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने आयर्लंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर ही भुमिका पार पाडली आहे. नुकतेच त्याच्या नेतृत्वाखाली भारत न्यूझीलंड दौऱ्यात टी20 मालिका 1-0 अशा पराभूत झाला.
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या जबाबदारीखाली संघाला आशिया कपच्या सुपर फोरच्या सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. हे काही कमी होते का संघ टी20 विश्वचषखाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 विकेट्सने हरला. यामुळे त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. Hardik Pandya Will be Captain for INDvSL T20 & ODI Series
श्रीलंकेचा भारत दौरा 2023 (टी20 आणि वनडे मालिका)-
3 जानेवारी – पहिली टी20 (मुंबई)
5 जानेवारी – दुसरी टी20 (पुणे)
7 जानेवारी – तिसरी टी20 (राजकोट)
10 जानेवारी – पहिला वनडे (गुवाहाटी)
12 जानेवारी – दुसरा वनडे (कोलकाता)
15 जानेवारी – तिसरा वनडे (तिरुअनंतपूरम)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भाऊ पेटलाय! रोहित लागोपाठ दोन दिवसांपासून नेटमध्ये गाळतोय घाम, श्रीलंकेविरुद्ध मिळणार का संधी?
श्रीलंकेच्या चाहत्याने अश्विनशी पंगा घेऊन केली मोठी चूक, फिरकी मास्टरने दिले जशास तसे उत्तर





