---Advertisement---

भाऊ पेटलाय! रोहित लागोपाठ दोन दिवसांपासून नेटमध्ये गाळतोय घाम, श्रीलंकेविरुद्ध मिळणार का संधी?

On: सोमवार, डिसेंबर 26, 2022 11:26 AM
---Advertisement---

भारताने नुकतेच बांगलादेश दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. या मालिकेत भारत केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळला, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर होता. भारत आता 3 जानेवारीपासून घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. याआधी भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे रोहितने सरावाला सुरूवात केली आहे. आता निवडकर्ते त्याला संघात घेतात की नाही यावर लक्ष असणार आहे.

भारत श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 आणि तेवढ्याच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी बोर्ड 27 डिसेंबरला भारताचा संघ घोषित करणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सोमवारी (26 डिसेंबर) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी ग्राऊंडवर सराव केला. यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत संघात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याने रविवारीही (25 डिसेंबर) सराव केल्याचे समोर येत आहे.

रोहितने सरावानंतर मुंबई रणजी संघाची भेटही घेतली. यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादवही रणजीत परतला. त्याने पहिल्याच सामन्यात हैद्राबाद विरुद्ध झटपट 90 धावा केल्या होत्या. भारत फेब्रुवारी-मार्चमध्ये 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळणार आहे. या मालिकेत भारताच्या संघात अनेक नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. या मालिकेतून सूर्यकुमारही भारताच्या कसोटी संघात पदार्पण करू शकतो.

रोहित यावर्षी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, बांगलादेश यांच्याविरुद्धच्या कसोटी सामन्यांना दुखापतीमुळे मुकला. त्याला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. टी20मध्ये तो नेहमीच उत्तम असतो मात्र या प्रकारातही त्याच्यासाठी हे वर्ष निराशाजनक ठरले. त्याने 29 सामन्यांत 24च्या सरासरीने केवळ 656 धावा केल्या. दुसरीकडे सूर्यकुमारने 31 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 1100पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच विराट कोहलीने देखील पहिले शतक आंतरराष्ट्रीय टी20 शतक ठोकले.

ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक खेळला गेला, ज्यामधील रोहितची एकही खेळी भारताच्या लक्षात राहण्यासारखी नाही. कारण तेथेही त्याची बॅट शांतच राहिली. आता श्रीलंकेविरुद्ध त्याला संधी मिळाली, तर तो फॉर्ममध्ये परत यावा हीच अपेक्षा असणार आहे.

रोहितची आंतरराष्ट्रीय टी20मधील कामगिरी पाहिली तर त्याने 148 सामन्यात 31.32 सरासरीने 3853 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकारमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 4 शतके केली आहेत. Rohit Sharma batted in the nets he could available for T20 series vs Sri Lanka

भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी20 सामना 3 जानेवारीला मुंबईमध्ये खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कौतुकास्पद! क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्नच्या सन्मानार्थ मोठा निर्णय, बदलले महत्वाच्या पुरस्काराचे नाव
श्रीलंकेच्या चाहत्याने अश्विनशी पंगा घेऊन केली मोठी चूक, फिरकी मास्टरने दिले जशास तसे उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---