भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याशी संबधित मोठी बातमी रविवारी (26 नोव्हेंबर) समोर आली. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स 2022मध्ये आयपीएल विजेता ठरला, तर मागच्या हंगामात संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. असे असले तरी, आगामी आयपीएल हंगामात हार्दिकने मुंबई इंडियन्ससाठी खेळण्याचा निर्णय घेतला. सोमवारी (27 नोव्हेंबर) मुंबई संघात परतण्याबाबत हार्दिकची पहिली प्रतिक्रिया समोर आली.
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2024 साठी 19 डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला गेला आहे. त्याआधी रविवारी (26 नोव्हेंबर) सर्व संघांनी आपली रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार होती. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्स संघात पुन्हा सहभागी होणार, अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू होत्या. पण रविवारी गुजरात टायटन्स संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीत हार्दिकचे नाव होते. हे पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले, पण काहीच वेळात हार्दिक मुंबईसाठी खेळणार, अशा बातम्या समोर आल्या. जवळपास 72 तास हार्दिक, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांनबाबत वेगवेगळ्या बातम्या येत होते.
सोमवारी अखेर हे स्पष्ट झाले की, हार्दिक आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्ससाठी खेळणार आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हार्दिकने तसा व्हिडिओच शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली. हार्दिकने व्हिडिओसोबत लिहिले आहे की, “मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झाल्यामुळे खूप आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. मुंबई, वानखेडे, पलटन, पुनरागमन हे सर्व चांगले वाटत आहे.”
View this post on Instagram
View this post on Instagram
दरम्यान, हार्दिक पंड्या याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना पदार्पण केले होते. आयपीएल 2015 साठी मुंबई फ्रँचायझीने त्याला 10 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर खरेदी केले होते. मुंबईकडून खेळताना त्याने स्वतःमध्ये मेहनत घेतली आणि पुढे भारतीय संघात जागा पक्की केली. रविवारी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर झाल्यानंतर हार्दिकचे नाव गुजरात संघासोबत होते. माध्यमांतील वृत्तांनुसार कागदोपत्री कौपचारिकता वेळेत पूर्ण होऊ शकली नाही, म्हणून हार्दिकचे नाव गुजरात टायटन्सने रिटेन केलेल्या खेळाडूंसोबत होते. अशीही माहिती समोर येत आहे की, हार्दिक स्वतः गुजरात संघाची साथ सोडून मुंबईसोबत खेळू इच्छित होता. याच कारणास्तव हा मोठा निर्णय गेतला गेला. मुंबईने त्याला संघात घेण्यासाठी 15 कोटी रुपये गुजरात फ्रँचायझीला दिले आहेत. तर दुसरीकडे कॅमरून ग्रीन (Cameron Green) मुंबईमधून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात गेला. मागच्या हंगामात मुंबईने 17.5 कोटी रुपयांमध्ये ग्रीनला खरेदी केले होते. (Hardik Pandya’s first reaction after returning to Mumbai Indians)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसी देणार दणका? चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद धोक्यात
IPL ब्रेकिंग! पंड्या मुंबईकडे जाताच Gujarat Titansचे कर्णधारपद ‘या’ पठ्ठ्याकडे, उंचावतील तुमच्याही भुवया